अजब ः शेतकऱ्यांचा माल शेतात पडून ग्राहकांना भाजी नाही

Strange: Farmers' goods fall in the field and consumers do not have vegetables
Strange: Farmers' goods fall in the field and consumers do not have vegetables

कोल्हापूर ः मागील लॉकडाउनच्या काळात भाजीपाला विक्रीस परवानगी होती. मात्र, लॉकडाउन काळात भाजीपाला खरेदी करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. सामाजिक अंतर राखण्याचा बोजवारा उडाला. तसा कोरोनाचा धोका वाढला. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाला घेणे बंद केले. सौदे बंद केले. परिणामी, 100 ते 150 टन भाजीपाल्याचे सौदे व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतीत भाजीपाला खराब होत आहे; तर ग्राहक भाजीपाल्याच्या प्रतीक्षेत आहेत, अशी स्थिती झाली आहे. 
परिणामी, तीन दिवसांपासून उपनगरीय भागात फिरस्ते भाजीपालाही विक्रेत्यांचे येणेही बंद झाले. किराणा माल दुकाने, मांस विक्रीची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे भाजीपाला लॉकडाउन संपेपर्यंत पुरेशा प्रमाणात मिळणे मुश्‍कील झाले. कोरोनाचे संकट पाहता ही गैरसोय आणखी काही दिवस सोसावी लागणार, असे दिसते. किमान काही प्रमाणात भाजी उपलब्ध करून शेतकरी व ग्राहकांना प्रशासनाने दिलासा देण्याची गरज आहे. 
येथील शाहू मार्केट यार्डात सांगली, सातारा, सोलापूर, कर्नाटक सीमा भागातून रोज भाजीपाला येतो. रोज जवळपास 40 ते 50 गाड्यांतून भाजीपाला येतो. त्याचे घाऊक बाजारपेठेत सौदे होतात. त्यासाठी मात्र लॉकडाउनमुळे बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाल्याच्या गाड्या बाहेरच्या जिल्ह्यांकडे जात आहेत. अशात स्थानिक शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याची विक्री होत होती, तीही सध्या बंद झाली आहे. 

क्वारंटाईनची भीती 
कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्हची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने बाहेरगावचे वाहनचालक भाजीपाला घेऊन कोल्हापुरात येण्यासाठी धजावत नाहीत. अशात अनेकांना क्वारंटाईनचीही भीती वाटते. अशा स्थितीत गेल्या 15 दिवसांत भाजीपाल्याची आवक कमी झाली. शेतकऱ्यांच्या मालाचेही नुकसान होत आहे. 

दुहेरी नुकसानीची शक्‍यता 
लॉकडाउन शिथिल असल्याच्या काळात बहुतेक फळभाज्या मुबलक प्रमाणात बाजारात येत होत्या. त्यामुळे भाव काहीसे नियंत्रणात जरूर होते. त्याला उठावही होता. ग्राहकांची सोय होत होती. आता लॉकडाउनमध्ये भाजीपाला सौदे बंद आहेत. लॉकडाउन शिथिल झाल्यास एकाच वेळी भाजीपाल्याची आवक वाढेल. तेव्हा त्या सर्वच मालाचा उठाव झाला नाही तर तो शिल्लक राहून खराब होण्याची शक्‍यता अधिक आहे. यातून शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ शकते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com