गडहिंग्लज बाजार समितीच्या उपआवाराला ऊर्जितावस्था मिळणार

The Sub-Yard Of Gadhinglaj Market Committee Will Be Developed Kolhapur Marathi News
The Sub-Yard Of Gadhinglaj Market Committee Will Be Developed Kolhapur Marathi News

चंदगड : तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपआवाराला ऊर्जितावस्था आणण्यासाठी त्याचा व्यापारी दृष्टिकोनातून विकास केला जाणार असल्याचे समितीचे प्रशासकीय अध्यक्ष अभय देसाई यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. तालुक्‍याला मध्यवर्ती असलेल्या या आवारात दुकान गाळे आणि कृषी प्रक्रिया उद्योगासाठी जागा उपलब्ध करून हे आवार व्यावहारिकदृष्ट्या नियंत्रणाखाली आणले जाणार आहे. 

चंदगड तालुका हा कृषी प्रधान आहे. भात, नाचणा, भुईमूग या पिकांबरोबरच कडधान्य, रताळी, बटाटा, भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. उत्पादक शेतकरी हा माल स्वतःच्या खर्चाने बेळगाव येथील मार्केट यार्डात नेऊन पोहोचवतात. परंतु तिथे व्यापाऱ्यांकडून अडवणूक होते. अपेक्षित दर मिळत नाही. शेतकऱ्यांची ही अडवणूक टाळण्यासाठी सुमारे तीस वर्षापूर्वी इथे बाजार समितीचे उपआवार स्थापन करण्यात आले.

काही काळ इथे शेती मालाचे सौदेही झाले. परंतु बेळगाव येथील व्यापाऱ्यांचा वरचष्मा असल्याने त्यांनी या बाजाराच्या विकासात आडकाठी आणली. नाविलाजास्तव शेतकऱ्यांना बेळगाव मार्केट यार्डावर अवलंबून रहावे लागले. बाजार समितीकडून प्रयत्न तोकडे पडल्याने अनेक वर्षापासून हे आवार उपयोगात आलेले नाही. 

शेतकरी, तरुणांना संधी 
दरम्यान, या बाजाराचे तालुक्‍याचे मध्यवर्ती ठिकाण, व्यापाराच्या अनुषंगाने नवी तंत्रज्ञान पद्धती पाहता इथे दुकान गाळे काढून ते विक्रेत्यांना दीर्घ काळासाठी भाडोत्री द्यायचे नियोजन आहे. त्याशिवाय उर्वरित जागेत काजू प्रक्रिया सारख्या कृषी माल उद्योगांनाही जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कृषी माल उत्पादक शेतकरी, व्यापार करू इच्छिणारे तरुण तसेच प्रक्रिया उद्योग करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com