"त्या' चौघींचं सर्व्हिसिंग सेंटर बनतोय कौतुकाचा विषय

success story four women Servicing Center sangli marathi news
success story four women Servicing Center sangli marathi news

सांगली : कोरोना आपत्तीमुळे नोकऱ्या गेल्या... व्यवसाय बुडाले... खाण्यापिण्याचे वांदे झाले. हातातोंडाची मिळवणी करताना नाकीनऊ आले. या संकटातून त्या चौघींना शोधली चाकोरीबाहेरची वाट . पुरुषांची मक्‍तेदारीतील या व्यवसायात या चौघींची ही झेप सर्वांसाठी अनुकरणीय अशीच. कोरोना टाळेबंदीत या चौघींवर बेरोजगारीची वेळ आली. टाळेबंदीत घराबाहेर पडणेही मुश्‍किल बनले. एकमेकींची आधीपासूनच चांगली ओळख होतीच मात्र सर्वांचाच रोजगार गेल्याने कोणी कोणाला मदत करायची? सर्वांनाच मर्यादा होत्या. सुरवातीला ओळखीच्या लोकांनी थोडीफार मदत केली. मात्र टाळेबंदी लांबतच गेली. किती दिवस घरात बसायचे, खायचे काय, पोराबाळांचे कसे होणार अशा नाना प्रश्‍नांना सामोरे जात त्यांचा दिवस जायचा. ही कहाणी आहे सांगलीतील त्या चार रणरागिणींची...

सांगलीत कत्तलखान्याजवळून शामरावनगरात जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरच त्याचं सर्व्हिसिंग सेंटर दिमाखात सुरु आहे. यातल्या गीता संभाजी गायकवाड शाहु महाराज रस्त्यावर (शंभर फुटी) आधीचा चहाचा गाडा चालवायच्या. शहीरा चॉंद शेख व सुमैय्या शकील बागणीकर बायडिंगची कामे करायच्या. तर सरिता बळवंत जाधव या पडेल ती कामे करीत संसाराचा भार पेलायच्या. कोरोना टाळेबंदीत या चौघींवर बेरोजगारीची वेळ आली.

टाळेबंदीत घराबाहेर पडणेही मुश्‍किल बनले. एकमेकींची आधीपासूनच चांगली ओळख होतीच मात्र सर्वांचाच रोजगार गेल्याने कोणी कोणाला मदत करायची? सर्वांनाच मर्यादा होत्या. सुरवातीला ओळखीच्या लोकांनी थोडीफार मदत केली. मात्र टाळेबंदी लांबतच गेली. किती दिवस घरात बसायचे, खायचे काय, पोराबाळांचे कसे होणार अशा नाना प्रश्‍नांना सामोरे जात त्यांचा दिवस जायचा. परिसरातील अकबर हुसेन मुजावर यांनी त्यांची ही व्यथा जाणली. त्यांनीही त्यांना यथाशक्‍ती मदत केली. मात्र असं किती दिवस जगायचे? मग त्यांनीच आम्हाला मदत नको काम द्या असे त्यांना सांगितले. 

मुजावर यांच्याकडे सर्व्हिसिंग सेंटरचे साहित्य पडून होते. ते व्हॅक्‍युम क्‍लिनर, फेस मशीन, एचटीपी सेट, एअर कॉंम्प्रेसर यासह बोअरचे पाणीही वापरण्यास विनामूल्य दिले. शिवाय ते साहित्य चालवण्याचे प्रशिक्षणही दिले. थोड्याशा प्रशिक्षणानंतर त्यांना हे काम सहज जमू लागले. उपासमारीपेक्षा हा व्यवसाय कधीही परवडला म्हणून चौघींनी सर्व काही शिकून घेतले. दुचाकी असो वा चारचाकी ती अल्पदरात चकाचक करण्याचे कसब त्यांनी अल्पावधीत मिळवले. अवघ्या चार महिन्यात त्याचं काम म्हणजे "हम किसी से कम नही' असंच होते. साहजिकच त्यांच्याकडे वाहने येऊ लागली. आता सहा महिन्यात त्यांनी या व्यवसायात चांगलाच जम बसवला आहे. 

"कोरोनाच्या संकटातून आम्हाला ही नवी वाट दिसली. अकबरभाईंच्यामुळेच ते शक्‍य झाले. स्वस्तात चांगली सेवा द्यायचा आमचा प्रयत्न आहे. व्हॅक्‍युम मशीनव्दारे स्वच्छता, फेशवॉश, डॅशबोर्ड स्विच क्‍लिनिंग अशा साऱ्याच कामाबद्दल सर्वांनी आमचे कौतुक केले आहे. त्याचे आम्हा चौघींना समाधान आहेच. परिसरातील सर्वच महिलांसाठी आम्हाला काम करायचं आहे. येत्या महिलादिनी आम्ही त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर घेणार आहोत. '' 
सुमैय्या बागणीकर 

संपादन- अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com