गावाच्या उपकाराची परतफेड करणारा उद्योजक 

सदानंद पाटील 
सोमवार, 1 जून 2020

स्वतःच्या आणि कामगारांच्या श्रमावर विश्वास ठेवून वाटचाल करणाऱ्या वनिता ऍग्रो केमचे कार्यकारी संचालक नेताजी पवार यांच्याशी सकाळने वातचीत केली. 

कोल्हापूर - उद्योगासाठी जिल्ह्याबाहेर आणि परराज्यात संधी असताना केवळ गावाची ओढ, गावानं शिक्षण घेण्यासाठी दिलेले बळ, रयत शिक्षण संस्थेतील संस्कार यामुळेच शिरोळ तालुक्यातील टाकवडे सारख्या गावात वनिता ऍग्रोची स्थापना झाली. शेतीला खतांचा पुरवठा करणारी ही कंपनी शेतकऱ्यांशी नाळ जोडून आहे. स्वतःच्या आणि कामगारांच्या श्रमावर विश्वास ठेवून वाटचाल करणाऱ्या वनिता ऍग्रो केमचे कार्यकारी संचालक नेताजी पवार यांच्याशी सकाळने वातचीत केली. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोल्हापुरतातील 300 ते 400 लोकांना रोजगार देताना महिन्याला 5 कोटी रुपयांची रक्कम कामगारांच्या पगारावर खर्च केली जात आहे. अगदी 10 वी पास, नापास पासून ते केमिकल इंजिनियर, एमबीए, सायन्स पदवीधर असे शिक्षण घेतलेले तरुण या कंपनीत काम करत आहेत. कितीही कमी पगारात परप्रांतीय कामगार मिळत असले तरी सुध्दा निव्वळ नफेखोरीचा  विचार न करता उद्योजक नेताजी पवार यांनी स्थानिक लोकांवर विश्वास टाकला, त्यांना प्रशिक्षण दिले, शासकिय नोकरी प्रमाणे  सेवा आणि सुविधा देत  समाजाचे ऋण फेडण्यासाठी पाऊल टाकले. त्यांचा हा प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे.

 

हे पण वाचा - भोंदुबाबाने घातला तब्बल ३५ लाखांना गंडा ; पती-पत्नीस अलिप्त राहण्याचा द्यायचा सल्ला 

हे पण वाचा - अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा ; संभाजी राजे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: success story on kolhapur business