कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने लय भारी

Sugar factories in Kolhapur district have a heavy rhythm
Sugar factories in Kolhapur district have a heavy rhythm

कोल्हापूर ः यावर्षीच्या साखर हंगामात 15 मार्चअखेर राज्यातील हंगाम घेतलेल्या 188 साखर कारखान्यांपैकी 88 कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्‍कम शेतकऱ्यांना आदा केली आहे. हंगामातील अनेक अडचणींवर मात करत सुमारे 1822 कोटी 15 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. यात जिल्ह्यातील तब्बल 15 कारखान्यांचा समावेश आहे.

अपुरी तोडणी-ओढणीची यंत्रणा, ठप्प साखर विक्री, त्यामुळे बॅंकांकडून उचल मिळण्यात अडचण, हमीभावात वाढ करण्याचा प्रलंबित असलेला निर्णय आदी कारणांनी यंदा अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अशा स्थितीत कारखान्यांनी जास्तीत जास्त एकरकमी एफआरपी देण्याबर भर दिला आहे. केवळ तीन कारखान्यांनी अजून रुपयाही दिलेला नाही.

राज्यात यावर्षी 188 कारखान्यांनी हंगाम घेतला. 15 मार्चपर्यंत यापैकी 17 कारखान्यांनी 49 टक्के, 81 कारखान्यांनी 99 टक्‍क्‍यापर्यंत तर 88 कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी आदा केली. राज्यातील एकूण एफआरपीची रक्कम 1822 कोटी 15 लाख रुपये होते, यापैकी 1585 कोटी सहा लाख आदा केली असून 238.50 कोटी रक्कम प्रलंबित आहे. 22 मार्चपर्यंत राज्यातील 59 कारखान्यांचा हंगाम बंद झाला आहे. उर्वरित 129 कारखान्यांपैकी बहुंताशी कारखाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद होतील.

देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेची मागणी ठप्प आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनचा फटका बसला असताना यावर्षीही त्याचाच सामना करण्याची वेळ आली आहे. दक्षिणेकडील अनेक राज्यात महाराष्ट्रातून पूर्वी साखर जात होती; पण यावेळी उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील साखरेच्या वाहतुकीचा खर्च जास्त असल्याने या राज्यातील महाराष्ट्राच्या मार्केटवर उत्तर प्रदेशने कब्जा केला आहे. त्याचाही परिणाम साखर विक्रीवर झाला आहे. सद्यस्थितीत गोदामे तर फुल्ल आहेतच पण कारखान्याच्या आवारातही साठा करण्याची वेळ आली आहे. 

जिल्ह्यातील 15 कारखाने 
शंभर टक्के एफआरपी दिलेल्या कारखान्यांत जिल्ह्यातील 22 कारखान्यांपैकी गुरुदत्त-टाकळी, राजाराम-बावडा, शाहू-कागल, दत्त-शिरोळ, बिद्री-कागल, नलवडे-गडहिंग्लज, मंडलिक-हमिदवाडा, पंचगंगा-इचलकरंजी, गायकवाड-बांबवडे, डी. वाय.-गगनबावडा, घोरपडे-सेनापती कापशी, दौलत-चंदगड, दालमिया-आसुर्ले, जवाहर-हुपरी व इंदिरा-भुदरगड या 15 कारखान्यांचा समावेश आहे. 

"भोगावती'ही आघाडीवर 
यंदाच्या हंगामात अडचणीत असलेल्या भोगावती कारखान्यांनेही तब्बल 79 टक्के एफआरपी आदा केली आहे. "कुंभी'ने 81 टक्के, "ईको-केन' ने 84 टक्के, हेमरस-चंदगड'ने 86 टक्के तर कोरे-वारणा कारखान्याने 71 टक्के एफआरपी आदा केली आहे.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com