विदर्भ, मराठवड्यातले मुकादम ऊस वाहतुकदारांची फसवणूक करतात; आमदारांनी केली कारवाईची मागणी

sugarcane employee for face many problems in kolhapur statement from ruturaj patil in kolhapur
sugarcane employee for face many problems in kolhapur statement from ruturaj patil in kolhapur

कोल्हापूर : ऊस तोडणी मजुर उपलब्ध करून देतो असे आश्‍वासने देऊन ऊस वाहतूकदारांची विदर्भ मराठवाडा भागातील मुकादमाकडून दरवर्षी लाखोंची फसवणूक केली जात आहे. असे प्रकार करणाऱ्या मुकादमावर गुन्हे दाखल करा अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली. त्यांच्या नेतृत्वाखाली ऊस वाहतूकदारांच्या शिष्टमंडळाने या मागणीचे निवेदनही दिले. 

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक सहकारी साखर कारखाने आहेत. यातून रोजगार उपलब्ध होतो. मात्र ऊस वाहतूकदार मालकांची ऊसतोडणी कामगार पुरविण्याच्या नावाखाली काही मुकादमांकडून फसवणूक होत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत अनेक ऊस वाहतूकदारांना याचा मोठा फटका बसला. त्यामुळे ग्रामीण भागातील ऊस वाहतूकदार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेत. ट्रक आणि ट्रॅक्‍टर मालक हे ऊस वाहतुकीचा ठेका घेतात. 

स्वतःच्या जोखमीवर मराठावाडा विदर्भ या भागातील मुकादमाना हंगामपूर्व ऍडव्हान्स म्हणून लाखो रुपये देतात. मात्र अलीकडे या मुकादमाकडून ऊस वाहतूकदाराची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक बलकवडे यांची भेट घेतली.

यावेळी बलकवडे यांनी फसवणूक करणाऱ्या मुकादमांविरोधात वाहतूकदारांनी तक्रारी द्याव्यात. त्यानुसार तातडीने संबधितावर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली. शिष्टमंडळात एस वाय किल्लेदार, मारुती पाटील, अविनाश पाटील, दिगंबर पाटील, अनिल माने, युवराज पाटील, अमित पाटील, बाबासो गोते, नितीन सूर्यवंशी यांचा समावेश होता.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com