कोल्हापुरच्या उद्योजकांना जागतिक बाजारपेठेत संधी

Suresh Prabhu's dialogue with entrepreneurs in Kolhapur
Suresh Prabhu's dialogue with entrepreneurs in Kolhapur

कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत कोरोनाच्या संकटानंतर मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरण होणार आहे. अशा काळात उद्यमशील कोल्हापुरकरांनी जागतिक बाजारपेठीत संधीचा लाभ उठवला पाहीजे. यासाठी जिल्ह्यात प्राथमिक संसाधनांचा विकास करणे, निर्यातक्षम कृषी उत्पादने बनवणे आवश्‍यक आहे, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापुरातील उद्योजकांना दिला.

वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. सेतू या संस्थेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. 

सेतूचे सचिव शशांक देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी उद्देश आणि वेबिनारच्या विषयाची माहिती दिली. सुमारे 60 जणांनी सोशल डिस्टन्स पाळत यामध्ये सहभाग घेतला. या प्रसंगी प्रभू म्हणाले,""कोल्हापुरामध्ये उद्यमस्नेही वातावरण आहे. येथील कृषक जमिन, सहकार चळवळ व औद्योगिक प्रगती चांगली आहे. ही बाब लक्षात घेऊनच मी रल्वे मंत्री असताना कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग आणि कोल्हापूर-पुणे-मंबई जलदगती रेल्वे हे दोन प्रकल्प हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पाचे काम सुरू असून त्याचा मी पाठपुरावा करत आहे.'' 

ते म्हणाले,""येथील सहकार चळवळीतील दोष दूर करून सहकाराचे जाळे अधिक व्यापक व सर्वसमावेश झाले पाहिजे. कृषी क्षेत्रात केवळ साखर या एकाच गोष्टीवर लक्ष न ठेवता अन्य कृषीपूरक उद्योग उभारले पाहिजेत. या क्षेत्रात निर्यातीला मोठी संधी आहे. कोल्हापुरातील फौंड्री उद्योगाची मदत संरक्षण क्षेत्रातील संसाधने निर्मितीमध्ये होऊ शकते. याचा लाभ येथील उद्योजकांनी घ्यावा.'' 


वेबिनारमध्ये सेतूचे अध्यक्ष रवी पाटील (सडोलीकर), उपाध्यक्ष अभय देशपांडे, नगरसेवक अजित ठाणेकर, गोशिमाचे अध्यक्ष सचिन शिरगावकर, चार्टड अकौंटंट सतिश डकरे, उद्योजक संजय पेंडसे, आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप सुर्वे, उद्योजक तेज घाटगे, संजय नाळे, रजनिकांत पाटील यांच्यासह उद्योग, व्यापार, सहकार क्षेत्रातील मान्यवर यामध्ये सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com