takawade women case kolhapur crime marathi news
takawade women case kolhapur crime marathi news

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला युवकाने केली मावशीची निर्घृण हत्या

कोल्हापूर : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला टाकवडे ता शिरोळ येथील 55 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे  27 वर्षे युवकाने आपल्या मावशीची हत्या केल्याने गावात खळबळ माजली आहे .

याबाबत मिळालेली माहिती अशी

 अंजनाची आई व संशयित आरोपी गणेश गायकवाड यांच्या, आज्जीच्या नावे घरकुल योजनेतून घर मंजूर झाले होते. घरकुल योजनेतून मंजूर झालेल्या रकमेतून घर बांधण्यात आले.  हे घर अपूर्ण राहिल्याने संशयित आरोपी गणेश याने सुमारे दोन लाख रुपये अतिरिक्त खर्च करून घराचे बांधकाम पूर्ण केले होते.


 नव्या बांधलेल्या घरात  गणेश आपल्या आईवडिलांसह राहण्यास आला होता. तेव्हापासून मयत  अंजना व गणेश यांच्यात वाद होता. रविवारी रात्री नवीन घरात राहण्याच्या कारणावरून भांडण झाले. या भांडणांमध्ये शिवीगाळ झाली. संशयित आरोपी गणेश याने अंजना हिच्या डोक्यावर, हातावर ,तोंडावर वार केले .तसेच त्याचा मित्र  प्रतीक बाबासो पाटील यांनी लाकडी दांडके च्या साह्याने मारहाण केली. यामध्ये अंजनाचा जागीच मृत्यू झाला.
 रविवारी रात्री उशिरा अंजनाची मुलगी, अमृता गणेश माने हिने शिरोळ पोलीस ठाण्यात गणेश व प्रतिक याच्याविरोधात फिर्याद दाखल केले आहे. पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे.

संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com