वैद्यकीय सुविधांसाठी पुढाकार घेणार ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील 

Take initiatives for facilities; BJP state president Chandrakant Patil
Take initiatives for facilities; BJP state president Chandrakant Patil

कोल्हापूर  : कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. स्वॅब, एचआरसीटीसह इतर वैद्यकीय तपासणीसाठी अवाढव्य किंमत घेतली जाते. रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्‍सिजनचा तुटवडा, अशा स्थितीत लोकांना छोटे-छोटे ऑक्‍सिजन जनरेटर किंवा ऑक्‍सिजन युनिट देण्यासाठी भाजप पुढाकार घेईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यांशी चर्चा केल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
ते म्हणाले, ""कणेरीमठ येथे काडसिद्धेश्‍वर महाराजांच्या हॉस्पिटलमध्ये 20 बेड अतिदक्षतेचे, 20 बेड ऑक्‍सिजनचे, 10 बेड सर्व रुग्णांसाठी आणि जागा मिळाल्यास 25 बेड कोरोनाची लक्षणे नाहीत; पण कोरोना झाला आहे, अशा रुग्णांसाठी दिली जातील. जम्बो सेंटरऐवजी विविध रुग्णालयांतील जागा करून बेडची संख्या वाढविता येणार आहे. यासाठी, भाजपकडून यंत्रणा सक्रिय झाली आहे. बेडसाठी 60 कोटी मंजूर झाले आहेत. याला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. काम सुरू केल्याची माहिती सौरभ राव यांनी दिली. खासगी दवाखान्यात महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार केले जावेत, यासाठी वरिष्ठ पातळीवर नियोजन करावे.'' 
ते म्हणाले, ""सध्या काही दवाखान्यात सुरू असणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दवाखान्यांना पॅकेज मिळालेले नाही. ते तत्काळ दिले पाहिजे. नवीन रुग्णालयातही योजना लागू केली पाहिजे, अशी मागणीही पाटील यांनी केली. यावेळी, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे आदी उपस्थित होते. 

कांदा निर्यात थांबविण्यासाठी पत्र 
कोरोनाच्या दरम्यान कांद्याची निर्यात अधिक झाली आहे. देशात कांदा कमी पडेल, तसेच किंमतही वाढेल. त्यामुळे, कांदा निर्यात करत असल्याचे केंद्र सरकारकडून सांगितले आहे. तरीही, पंतप्रधानांना पत्र लिहून निर्यात बंदी उठवावी, अशी विनंती केली आहे. निर्यातबंदीमुळे जे नुकसान होईल, त्याची भरपाई द्यावी किंवा ग्राहकांना रेशनिंगवर कांदा दिला जाईल; पण निर्यात थांबवून शेतकऱ्यांचे नुकसान करू नका, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com