"थर्टी फर्स्ट'ला इचलकरंजीत 249 वाहनधारकांवर कारवाई

Takes Action Against 249 Vehicle Owners In Ichalkaranji Kolhapur Marathi News
Takes Action Against 249 Vehicle Owners In Ichalkaranji Kolhapur Marathi News

इचलकरंजी : थर्टी फर्स्टसाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा चांगलाच फास आवळला. थर्टी फर्स्टच्या आदल्या रात्रीपासून दणक्‍यात कारवाईस सुरवात केली. थर्टी फर्स्टच्या एका दिवशी 249 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल 88 हजारांचा दंड आकारला. ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीम राबवत मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या 20 जणांवर कारवाईचा बडगा उगारला. 

यंदा थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन कोरोनाचे सावट असल्याने वाहतूक पोलिसांनी कंबर कसली. थर्टीफर्स्टला दिवसभर व रात्री विशेष मोहीम वाहतूक शाखेने हाती घेतली. शहरातील प्रमुख मार्गासह विविध ठिकाणी नाकाबंदी केली. शिवाजी पुतळा चौक, जनता चौक, झेंडा चौक, मरगुबाई मंदिर नदीवेस नाका, महासत्ता चौक, डेक्कन चौक, यड्राव फाटा अशा ठिकाणी नाकाबंदी करून पोलिस बंदोबस्त तैनात केला. टोळक्‍याचे फिरणे, हुल्लडबाजीला लगाम घालत बेशिस्त वाहनधारकांवर विशेष वॉच ठेवला.

कोरोनामुळे शासन निर्णयानुसार नियमांचे योग्य पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. रात्री वाहने तपासली. मोटार वाहन कायद्यांतर्गत 249 वाहनधारकांवर कारवाई केली. थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक शाखेकडून सुरू असणाऱ्या मॉडीफाय वाहनांवरील कारवाईस अनेक बुलेटस्वार व धूम स्टाईल वाहने बळी पडली. तसेच सिट बेल्ट न लावणे, विना व फॅन्सी नंबरप्लेट, मोबाईल टॉकिंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन यासह अन्य प्रकरणे बेशिस्त वाहनधारकांवर सीसीटिव्ही व इ चलनद्वारे वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. सर्वाधिक वाहनांवर कारवाई शहरातील बाह्य वळण मार्गावर करण्यात आली. 

ड्रंक अँड ड्राइव्हद्वारे निम्मा दंड 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर थर्टी फर्स्टला वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीम जोरदार राबवली. दोन दिवसांत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 25 जणांवर दंडात्मक कारवाई केली. थर्टी फर्स्टला यातील सर्वाधिक 20 वाहनधारकांवर कारवाई करून 40 हजारांचा दंड वसूल केला. थर्टी फर्स्टच्या एकूण दंडापैकी निम्मा दंड हा ड्रंक अँड ड्राइव्हद्वारे ठोठावला. ब्रिथ ऍनालायझरचा वापर या मोहिमेत करण्यात आला. तसेच मद्यपान केलेल्या वाहनधारकांची सरकारी रुग्णालयात नेऊन अल्कोहोल चाचणी करण्यात आली. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com