कागल तालुक्यातील तलाठी 25 हजार रुपयांची लाच घेताना जाळ्यात

 Talathi in Kagal taluka caught taking
Talathi in Kagal taluka caught taking

मुरगूड - कागल तालुक्यातील काळम्मा बेलेवाडी येथील तलाठी एम.आर.खपले आज 25 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत च्या जाळ्यात सापडले.

अधिक माहिती अशी,काळम्मा बेलेवाडी (ता.कागल ) येथील स्वप्नील घुगरे यांच्याकडे तलाठी एम.आर.खपले यांनी जुन्या सातबारा उताऱ्या प्रमाणे ऑनलाईन सातबारा उताऱ्यामध्ये जमिन क्षेत्राची दुरुस्ती होवून नवीन सातबारा उतारा मिळणेकरीता 04.08.2020 रोजी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.तडजोडीअंती 45 हजार रुपयांवर हा व्यवहार ठरला होता.यातील 25 हजार रुपये यापूर्वीच श्री.घुगरे यांनी तलाठी खपले यांना दिले आहेत.

त्यानंतर आज उर्वरीत पंचवीस हजार रुपयांची रक्कम आज देण्याचे ठरले होते. स्वप्नील घोगरे यांनी याबाबतची माहिती कोल्हापूर लाचलुचपत विभागास दिली.त्यानुसार उर्वरित रक्कम खपले यांना देण्याचे ठरवले.आज त्यासाठी सापळा रचण्यात आला.व तलाठी एम.आर.खपले ही रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात सापडले.ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा पथक  
श्री.आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक,श्री.जितेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक, सहा.फौ.शाम बुचडे,पो.हे.कॉ शरद पोरे, सुरज अपराध, पो.कॉ.रुपेश माने,संग्राम पाटील यांनी कारवाई केली.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com