तलाठी महिला पॉझिटिव्ह, संपर्कातील 15 जण निगेटिव्ह 

तलाठी महिला पॉझिटिव्ह, संपर्कातील 15 जण निगेटिव्ह 

गारगोटी : येथील श्री कॉलनीतील "त्या' कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या पत्नीचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. त्या तलाठीपदी कार्यरत आहेत. एकाच कुटुंबातील दोघे पॉझिटिव्ह आढळल्याने गारगोटीची रुग्ण संख्या आता दोनवर पोचली आहे. 

येथील श्री कॉलनीतील "त्या' 50 वर्षीय व्यक्तीचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यासमवेत असलेल्या पत्नीची तपासणी केली असता आज सकाळी तिचा अहवालही पॉझिटिव्ह आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

या दोघा दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलेले एक शिक्षक, कोरोना बाधित व्यक्तींचे आई-वडील, दोन मुले व त्यांच्या पाचवडे या मूळ गावातील नातेवाईक असे सात जण "हाय रिस्कवर' होते तसेच गारगोटीतील काही जण अशा 15 जणांची तपासणी करून अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या घटनेनंतर महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यातील तपासणी केलेल्या 15 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी निःश्‍वास टाकला आहे. 

तहसीलदार अमोल कदम म्हणाले की, श्री कॉलनी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला असून कॉलनीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरपंच संदेश भोपळे व पदाधिकाऱ्यांनी येथे शनिवारपासून दोन दिवसाचा लॉकडाउन जाहीर केला आहे.'' श्री कॉलनीतील प्रत्येक घरी जाऊन आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका सर्व्हे करीत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. एत्नाळकर यांनी दिली. दरम्यान, ग्रामपंचायतीने या कॉलनीत औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला आहे. 

दृष्टिक्षेप 
- कॉलनीतील एकाच कुटुंबातील दोघे पॉझिटिव्ह 
- कोल्हापुरातील रग्णालयात उपचारासाठी दाखल 
- दाम्पत्याच्या संपर्कातील 15 जण निगेटिव्ह, सर्व जण क्वारंटाईन 
- महसूल कर्मचाऱ्यांनी टाकला निःश्‍वास 


संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com