कोल्हापूर विभागातील आयकरात कपात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

कोल्हापूर : कोल्हापूर विभागामधून गोळा होणाऱ्या आयकरात कपात झाल्याची आहे. या वर्षाची आयकर विवरण पत्रेदेखील कमी प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे कोल्हापूर आयकर विभागाला त्यांचे दोन हजार तीनशे कोटींचे आयकर गोळा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत करा, असे आवाहन मुख्य आयकर आयुक्त अनुराधा भाटीया (पुणे) यांनी येथे केले.

चार्टर्ड अकौंटंटसच्या पश्‍चिम भारतातील कोल्हापूर शाखा तसेच इतर व्यापारी संघटनांबरोबर आयकर विभागाने करदात्यांशी संवाद साधला. सी ए इन्स्टिटयूट येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या,""करदात्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. करदात्यांना कोणताही त्रास न होता आयकर गोळा करण्यासाठी आयकर विभागाने विविध योजनांचा अवलंब केला आहे. कोल्हापूर विभागातर्फे दोन हजार तीनशे कोटी उद्दिष्टांपैकी फक्त 994 कोटीचे उद्दिष्ट पार केले आहे. त्यामुळे व्यापारी संघटना, सी. ए. इन्स्टिटयूट तसेच करदात्यांनी जास्तीत जास्त कर भरणा करून कोल्हापूर आयकर विभागाला त्यांचे उद्दिष्टांत मदत करावी'' 

करदाते,आयकर सल्लागार, व्यापारी असोसिएशन यांचेकडून करदात्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यात आल्या. चार्टर्ड अकौंटंट कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष अमित शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संजय व्हनबटे यांनी अडचणींचा उहापोह केला. चार्टर्ड अकौंटंट कोल्हापूर शाखेचे सचिव तुषार अंतुरकर यांनी आभार मानले. 

यावेळी पुणे आयकर विभागाचे मुख्य आयुक्त शौविक गुहा, आयुक्त राजीव कुमार, कोल्हापूर आयकर विभागाचे प्रधान आयुक्त डार्स सॅम्युएल, आयुक्त (अपील ) अमोल कामत, संयुक्त आयुक्त धनंजय महाजन, अधिकारी तसेच चार्टर्ड अकौंटंट कोल्हापूर शाखेचे उपाध्यक्ष अनिल चिकोडी, कोषाध्यक्ष सुशांत गुंडाळे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चेतन ओसवाल आणि विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tax deduction in Kolhapur region