लई भारी ! तो करतोय स्टार्टअप आर्टस्‌ विथ वॉल पेंटींग...

अमोल सावंत
मंगळवार, 14 जुलै 2020

कागदावर चित्र काढणे अवघड नाही; पण भिंतीवर चित्र काढून पूर्ण करणे कठीण काम तो करत आहे...

कोल्हापूर - कागदावर चित्र काढणे सोप्पे. चित्र व्यवस्थित झाले नाही तरी ते खोडता येते; मात्र भिंतीवर तुम्ही चित्र काढता तेव्हा ते खोडता येत नाही. खरे चॅलेंज इथेच असते. चित्र न खोडता, वेडेवाकडे न करता ते एकसाथ भिंतीवर चित्र काढणे ही कला आहे. ही कला, हा अभ्यास तेजस विजय सावंत यांनी साध्य केला. तेजसने स्वत:च्या बंगल्यांतील अनेक खोल्यांमध्ये भिंतीवर अशी चित्रे काढली आहेत. ती चित्रे ज्यांनी पाहिली त्यांनीही तेजसला आपल्या घरातील भिंतीवर वेगवेगळी चित्रे काढण्यासाठी आमंत्रित ही केले आहे.

पंचायत समितीच्या मागील बाजूस सीता कॉलनीत तेजसचा 'जयश्री' बंगल्यात स्वत:चा स्टुडिओ आहे. न्यू कॉलेजमधून त्याने आर्किटेक्‍चर पूर्ण केले; पण लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. तेजसने अशी अनेक चित्रे कागदावर रेखाटली आहेत. तो म्हणतो, "कागदावर चित्र काढणे अवघड नाही; पण भिंतीवर चित्र काढून पूर्ण करणे कठीण काम आहे.'' चित्रकलेचा ध्यास घेऊन आर्किटेक्‍चर पूर्ण केले. यानंतर चित्रपट निर्मिती कशी केली जाते? कोणत्या तंत्राने चित्रपट पूर्ण होतो इकडे त्याचे लक्ष गेले. सिनेमॅटॉग्रॉफी कोर्स करायचे ठरविले. अमेरिकेतील न्युयॉर्क फिल्म ऍकॅडमीत तेजसला ऍडमिशन मिळाले; मात्र कोरोनाच्या प्रभावामुळे अमेरिकेला तो जाऊ शकला नाही. तत्पूर्वी, मुंबई फिल्म ऍकॅडमीत प्रोफेशनल प्रॅक्‍टिस अन्‌ इंटर्नशिपसाठी सुरू केली. आतापर्यंत सहा ते सात शॉर्टफिल्मस्‌ तयार केल्या आहेत.

व्हिडीओ पाहा -

तेजस म्हणतो, "सिनेमॅटोग्राफी म्हणजे, एखादे पिक्‍चरचे सीन्स्‌ डिझाईन करावे लागतात. तेही कॅमेरा आणि लाईटस्‌च्या माध्यमातून. यासाठी ऍरी ऍलेक्‍स, रेड ड्रॅगन कॅमेरे वापरले जातात. मी ही सर्व तंत्रे शिकलो. लॉकडाऊनमुळे मला मुंबईत जाता आले नाही. यासाठी मी फिल्म एडिटिंग, ऍनिमेशन (व्हीएफएक्‍स) तंत्रनावर कामा सुरु आहे. मी फायनल कट हे सॉफ्टवेअर शिकलो. यासाठी आजी-आजोबा, आई-वडिलांनी मला सॉफ्टवेअर्स, कॅमेरा, लॅपटॉप घेऊन दिला.'' हे करत असताना तेजस हा 2015 मध्ये भिंतीवर चित्रे काढण्याची प्रॅक्‍टिस करु लागला. सुरवातीला भिंतीवर चित्र काढताना ब्लॅक कलरचा वापर केला. प्रथम चित्रे छोटी काढली. नंतर कागदापेक्षा भिंतीवरील चित्रे काढणे चॅलेंज आहे, हे समजल्यानंतर तो भिंतीवर मोठी चित्रे काढू लागला.

वाचा - पश्‍चिम घाटाची निर्मिती ज्वालामुखीच्या विवरातून तर जलजन्य खडक आढळतात या भागात

तो म्हणतो, "भिंतीवर चित्र काढताना पोस्टल, फॅब्रिक कलरचा वापर केला जातो. हे रंग खराब होत नाहीत. धुतले जात नाहीत. मी पहिल्यांदा रोनाल्डोचे चित्र काढले. रोनाल्डोची पोझ भिंतीवर मी रेखाटली. रंगही भरले. मग जॅक स्पॅरो उर्फ जॉनी डिप, आयर्न मॅन (टोनी स्टार) रेखाटला. पोट्रेट करण्यावर लक्ष केंद्रीत केले. यानंतर मी ग्रॅन्ड स्केलवर मार्व्हलची ऍव्हेंजर सीरीज भिंतीवर चित्रीत केली. ही सीरीज चार मीटर बाय साडेतीन मीटर अशी आहे. यामध्ये हिरो, व्हिलन अशी 34 पात्रे आहेत. यासाठी एक ते दिड महिना चित्र पूर्ण करायला लागले.''

करिअर सिनेमॅटोग्राफीमध्येच

पुढील करिअर सिनेमॅटोग्राफीमध्येच करायचे आहे, असे ते म्हणतो. आतापर्यंत मित्रांच्या घरी, कॉलेजमध्ये तेजसने भिंतीवर चित्रे काढली आहेत. गणेश चतुर्थीला तो मुर्तीच्या मागील डेकोरेशन, थ्रीडी लाईटस्‌ अशी माध्यमे वापरुन तो चित्रे काढतो. जेव्हा घरात मार्व्हल सीरीज पूर्ण झाली तेव्हा अनेकजण पाहण्यासाठी ते येत होते. मार्व्हल सीरीज जेव्हा सोशल मीडियावर टाकली तेव्हा मार्व्हल कंपनीतील एका इंजिनिअरने ही सिरीज स्विकारली. कौतुक ही झाले.

 

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tejas sawant doing startup arts with wall painting