प्राध्यापकांना उत्सुकता; मुदतवाढ की थेट पाच वर्षांची नियुक्ती..?

term of contract assistant professor at Shivaji University is coming to an end on December 7
term of contract assistant professor at Shivaji University is coming to an end on December 7

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी सहायक प्राध्यापकांची मुदत ७ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के त्यांना मुदतवाढ देणार, की थेट पाच वर्षांसाठी नियुक्ती देणार, असा प्रश्‍न आकाराला आला आहे. त्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत होईल का, याची उत्सुकता आहे. सीएचबी प्राध्यापक नियुक्तीच्या मागणीला ते पूर्णविराम देतील का, अशी विचारणा होऊ लागली आहे.


कोरोनामुळे कंत्राटी प्राध्यापक हवालदिल आहेत. प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी त्यांची नेमकी स्थिती लक्षात आली. त्यांनी प्राध्यापकांना तीन महिने मुदतवाढ देऊन दिलासा दिला. ही मुदतवाढ ७ डिसेंबरला संपुष्टात येत असून, विद्यापीठातील अधिविभागांमधील कामकाज कोण सांभाळणार, असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. विद्यापीठातील नियमित २१० पैकी सुमारे ८४ प्राध्यापक कार्यरत आहेत. कंत्राटी प्राध्यापकांना कामाचा अनुभव असल्याने ते परीक्षेसह अन्य कामांची जबाबदारी पेलत आहेत. त्यांना केवळ अकरा महिन्यांसाठी सेवेत घेतले जात असल्याने त्यांच्यावर मर्यादा येत आहेत. कंत्राटीपैकी तेरा प्राध्यापक सीईबीसी प्रवर्गातले आहेत.

मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे त्यांची धाकधूक वाढली आहे. आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत नोकरभरती होणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यात महिन्याकाठी एखादा प्राध्यापक निवृत्त होत असल्याचे चित्र आहे. ही स्थिती लक्षात घेत कंत्राटी प्राध्यापकांना पाच वर्षांसाठी नियुक्ती दिली तर ते विभागात झोकून देऊन काम करतील, असा शैक्षणिक क्षेत्रातील सूर आहे.

त्यांना संशोधनाच्या कामातही लक्ष घालता येईल. त्यामुळे कुलगुरू डॉ. शिर्के त्यादृष्टीने पावले टाकतील का, हाच मुद्दा आहे. पाच वर्षांची नियुक्ती करताना ती नियमित पोस्ट नसणार, हे उघड आहे. विद्यापीठात सीएचबी तत्त्वावर प्राध्यापक नियुक्ती नको, असे जाणकारांना वाटते. त्याचा विचार करता कंत्राटी प्राध्यापकांची पाच वर्षांसाठी नियुक्ती व्हावी, अशी प्राध्यापकांची अपेक्षा आहे.

दृष्टिक्षेपात
 एकूण नियमित प्राध्यापक- २१० (२०१२ ची स्थिती)
 नियमित प्राध्यापक- ८४ (२०२० ची स्थिती)
 कंत्राटी सहायक प्राध्यापक- ७८ 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com