गडहिंग्लजला फेब्रुवारीत नाट्यमहोत्सव

Theatrical Festival Of Gadhinglaj In February Kolhapur Marathi News
Theatrical Festival Of Gadhinglaj In February Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : अनेक वर्षापासून खंडीत झालेली गडहिंग्लजच्या नाट्य परंपरेला उर्जितावस्था देण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नगरपालिकेतर्फे 5, 6 व 7 फेब्रुवारी रोजी नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात अनुक्रमे ह्येच्या आईचा वग, ऱ्हासपर्व आणि अलबत्या-गलबत्या या तीन दर्जेदार नाटकांची मोफत मेजवाणी शहरासह परिसरातील नाट्य रसिकांना मिळणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. 

कोरी म्हणाल्या, ""शहरात तीन दशकापूर्वी नाट्यपरंपरेने गती घेतली होती. शहरातील कै. सुधाकर गोकाककर, कै. विश्‍वनाथ आलूकर, कै. निरंजन खिचडी, कै. मेहबूब मकानदार, जे. जे. पाटील यांनी ही चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. या मंडळींनी अनेक नाटके रंगमंचावर सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेच, शिवाय अनेक कलाकार या मातीत घडविले. मात्र अलीकडील काही वर्षात ही परंपरा खंडीत झाली होती. ही नाट्य चळवळ पुन्हा जिवंत करण्यासाठी नगरपालिकेने या नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. 

या नाट्य महोत्सवामुळे निश्‍चित गडहिंग्लजच्या नाट्य चळवळीला गती मिळण्यास मदत होणार आहे. नाट्यमहोत्सवातील दोन नाटके ही सामाजिक, राजकीय विषयांवर भाष्य करणारी प्रायोगिक तर खास बालचमूंसाठी व्यावसायिक नाटक अलबत्या गलबत्या हे नाटक सादर होणार आहे. ही सर्व नाटके बॅ नाथ पै प्रशालेच्या जनता खुले नाट्यगृहात सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहेत. या नाटकांसाठी कोणतेही पास अथवा तिकीट असणार नाही. अग्रक्रमाने येणाऱ्यांना आसनव्यवस्थेत प्राधान्य राहणार आहे. या महोत्सवासाठी प्रा. शिवाजी पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे. नाट्यमहोत्सवातील या दर्जेदार नाटकांचा रसिकांनी लाभ घ्यावा.'' 

नाट्यमहोत्सवात नाट्य कलावंतांचा सन्मानही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, बांधकाम समिती सभापती नरेंद्र भद्रापूर, लेखापाल शशिकांत मोहिते उपस्थित होते. 

नाट्यगृह उभारणार 
कोरी म्हणाल्या, ""शहरात अद्यावत नाट्यगृह नसल्याने व्यावसायिक नाटके येण्यास अडचणी येत आहेत. आगामी दोन वर्षात पालिकेतर्फे नाट्यगृह उभारणीसाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. नाट्य चळवळीला बळ मिळावे आणि ही परंपरा खंडीत होवू नये यासाठी प्रयत्नशील राहू. जशी लोकशिक्षण व्याख्यानमाला अखंडीतपणे सुरू आहे, त्याच पद्धतीने नाट्यमहोत्सवसुद्धा दरवर्षी अखंडीत ठेवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com