भावांनो यंदा इर्षा नाही...नियम पाळूया, करूया विधायक गणेशोत्सव...

संभाजी गंडमाळे 
सोमवार, 13 जुलै 2020

आगामी गणेशोत्सवात झगमगाटाची ईर्ष्या करण्यापेक्षा शासनाचे सर्व नियम पाळून विधायक कार्याची स्पर्धा करूया, असे आवाहन शिवाजी पेठेतील विद्यार्थी कामगार मंडळाने केले आहे.

कोल्हापूर : आगामी गणेशोत्सवात झगमगाटाची ईर्ष्या करण्यापेक्षा शासनाचे सर्व नियम पाळून विधायक कार्याची स्पर्धा करूया, असे आवाहन शिवाजी पेठेतील विद्यार्थी कामगार मंडळाने केले आहे. मंडळातर्फे यंदाही विधायक गणेशोत्सवाची परंपरा जपली जाणार असून सव्वा चार फूटी कायमस्वरूपी फायबर गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. 

चेतना विकास मंदिर या शाळेतील विशेष मुलांनी केलेल्या इको-फ्रेंडली लहान उत्सव मूर्तीचे पूजन मंडळातर्फे केले जाणार असून मोठ्या मूर्तीसाठी कोणत्याही प्रकारचे हार-फुले स्विकारले जाणार नाहीत. त्याशिवाय गणपतीसाठी कोणत्याही प्रकारचे दागिने स्वीकारले जाणार नाहीत. नारळाच्या तोरणाऐवजी वह्या पुस्तकांचे तोरण बांधण्याचे आवाहन भाविकांना केले जाणार असून जमा झालेले शैक्षणिक साहित्य गरीब, गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहे. त्याशिवाय विधायक पेटी संकल्पनेंतर्गत पेटीच्या माध्यमातून जमा झालेली सर्व रक्कम सामाजिक संस्थांना मदत म्हणून दिली जाणार आहे. 

दृष्टिक्षेप 
- शिवाजी पेठेतील मंडळ जपणार सामाजिक बांधिलकी 
- सव्वा चार फूट कायमस्वरूपी फायबर मुर्ती बसविणार 
- "चेतना'च्या विशेष मुलांनी बनवलेल्या उत्सव मुर्तीचे करणार पूजन 
- मुर्तीसाठ हार-फुले स्विकारली जाणार नाहीत 
- नारळाऐवजी पुस्तकांचे तोरण बांधण्याचे आवाहन 
- गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणार 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there is no jealousy, let's do constructive Ganeshotsav