फोंडा घाट रस्त्यासाठी स्वंतत्र निधीच नाही

sakal (3).jpg
sakal (3).jpg

कोल्हापूर ः कोकण, गोव्याला जाण्यासाठी मध्यवर्ती मार्ग म्हणून उपयुक्त ठरलेल्या फोंडा घाट मार्गाची सद्या दुरावस्था आहे. दोन वर्षात घाट रस्ता नुतनीकरणासाठी सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीच आला नाही. त्यामुळे जेमतेम डागडुजीवरच काम भागविले जात आहे. परिणामी घाट मार्ग थोडा चांगला, बहुतांशी खाच खळग्यांचा बनला आहे. यातून प्रवासी व माल वाहतुकीसाठी सद्या पर्याय म्हणून गगनबावडा करूळ घाट मार्गाचा वापर केला जात आहे. यातून करूळ घाटातील वाहतुकीचा ताण वाढला आहे. 
पुणे, सोलापूर, साताऱ्याकडून गोवा, कोकणकडे जाण्यासाठी फोंडा घाट सोयीचा मानला जात होता. त्यामुळे पर्यटकांच्या गाड्या, नियमित एसटीची प्रवासी वाहतुक तसेच माल वाहतुक राधानगरी - दाजीपूर - फोंडा मार्गे कणकवली, सावंतवाडीच्या दिशेने होत होती. त्यामुळे या मार्गावर पूर्वी वाहतुक जास्त होती. 
दहा वर्षात मात्र कधी घाटाचा रस्ता खराब झाला, तर कधी घाटा पर्यंत जाणारा रस्ता खराब झाला असे प्रकार घडत गेले. पाच वर्षात राधानगरी ते फोंडा घाटा पर्यंताचा रस्ता नवा केला, तेव्हा घाटा पर्यंत जाण्याचा मार्ग सुकर झाला. तीन वर्षात मात्र घाटापासून तळ कोकणा पर्यंत अनेक ठिकाणी घाट रस्त्याला खड्डे पडले आहेत. हसणे ते फोंडा घाट मार्गावरही थोड्या फारफरकाने अशीच स्थिती आहे. 
याचा फटका म्हणून पणजीकडे फोंडा मार्गावरून जाणाऱ्या गाड्याची संख्या कमी झाली. तर राधानगरीतून कोकणात जवळच्या गावाना जाणारी एसटी प्रवासी वाहतुक थंडवली आहे. अशात पुणे, सोलापूर, मराठवाड्याकडून येणारा प्रवासी आंबोली मार्गे कोकणाला जाण्याला प्राधान्य देतात. 
कोल्हापूर, सोलापूर, सांगलीतून कोकणकडे जाणारा शेतीमाल वाहतूक बहुतांशी प्रमाणात करूळ घाटातून होते. करूळ घाटाचा ताण वाढतो आहे. पावसाळ्यात येथे दरडी कोसळण्याचे प्रमाण लक्षवेधी आहे. थोड्या फारफरकाने करूळ घाटाचा रस्ताचही काही ठिकाणी खाच खळग्यांचा आहे. घाटाच्या तळापासून तरेळे पर्यंतच रस्ता नव्याने करण्यात आला. तो चांगला आहे पुढे मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गाचे काम बऱ्या पैकी होत आले आहे.त्यामुळे करूळ घाटात प्रवासी व माल वाहतूक जोरात आहेत. 

नियोजन मंडळाच्या निधीचा आधार 
वरील बाब विचारात घेता फोंडा घाट मार्गावर अधून मधून दुरस्तीचे कामे केली जातात, मात्र भागातील प्रचंड पावसामुळे रस्त्याला सतत खड्डे पडतात. घाट रस्ता नवीन करण्यासाठी स्वतंत्र निधी आलेला नाही. जो खर्च केला जातो. तो फक्त जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून खर्च केला जातो. त्यातून फक्त रस्त्यांची डागडुजीच घडली आहे. 


13 किलो मीटरचा घाट 
रस्त्याची रूंदी अरूंद 
गेल्या पाच वर्षात दोन कोटी रूपयांच्या निधीतून डागडुजी.

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com