आजरा शहरात होणार वाहनतळ

There Will Be A Vehicle Parking Center In Ajara City Kolhapur Marathi News
There Will Be A Vehicle Parking Center In Ajara City Kolhapur Marathi News

 आजरा : आजरा शहरात वाहनांची गर्दी वाढली आहे. दररोज हजारो वाहन शहरात दाखल होत असतात. मुख्य बाजारपेठेसह प्रमुख रस्त्यावर वाहनचालक वाहने लावतात. त्यामुळे बहुतांश वेळा वाहतुक ठप्प होणे व वाहतुकीची कोंडी होणे, असे प्रकार वाढले आहेत. नगरपंचायत व पोलिस प्रशासनाला वाहतुकीचा प्रश्‍न डोकेदुखीचा झाला असून तो सोडवण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनतळासाठी जागा शोधण्यास नगरपंचायत प्रशासनाने सुरवात केल्याचे मुख्याधिकारी अजिंक्‍य पाटील यांनी सांगितले. 


शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. आजरा हे शहर तालुक्‍याचे ठिकाण असल्याने शासकीय कामे, खरेदी व अन्य अनुषंगीक कामांसाठी तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील नागरीक येत असतात. सध्या कोरोनाची पार्श्‍वभूमी असल्याने एसटी व सार्वजनिक वाहतुकीला मर्यादा आहेत. त्यामुळे नागरीक स्वतःची दुचाकी व चार चाकी घेवून येत असतात. ही वाहने थेट शहरात येत असल्याने वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

येणाऱ्या वाहनांसाठी शहराबाहेर वाहनतळ उभारण्याचा विचार नगरपंचायतीकडून सुरु आहे. वाहन तळासाठी जागा शोधल्या जात आहेत. पंचायत समिती जवळील बचत भवनचे पटांगण, जनावरांचा बाजाराची जागा, बळीराम देसाई शिक्षण संकुलकडील जागासह अन्य जागा यासाठी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. वाहनतळ शहराबाहेर झाल्यास बाजारपेठेतील वाहतुक कोंडीवर आळा घालता येईल. त्याचबरोबर वाहातुकीला शिस्त लावता येईल, असेही मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. 

सम-विषमसाठी पट्टे मारणार 
आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठेत सम-विषम पार्कींगची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी सम-विषमचे पट्टे मारले जातील. या आठवडाभरात बाजारपेठेत पार्किंगचे नियोजन केले जाणार आहे. पदाधिकारी व पोलिस प्रशासनाबरोबर याबाबत बैठक घेतली जाईल.

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com