
सेलीब्रेशनच्या पार्टीवरही यंदा मर्यादा असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
सरत्या वर्षाला निरोप यंदा शाकाहारानेच
कोल्हापूर : कोरोनाच्या कटु आठवणींना तिलांजली देत यंदा कोल्हापूरकर सरत्या वर्षाला निरोप देणार आहेत. मात्र, थर्टी फर्स्ट आणि मार्गशीर्ष गुरूवार, गुरूपुष्यामृत एकाच दिवशी आल्याने यंदा शाकाहारानेच घरोघरी आनंदोत्सवावर भर द्यावा लागणार आहे. दरम्यान, थर्टी फर्स्ट सेलीब्रेशनच्या पार्टीवरही यंदा मर्यादा असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
कोल्हापूर आणि मांसाहार हे एक अतूट समीकरणच. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने तर जोरदार आनंदोत्सवाची तयारी प्रत्येक वर्षी असते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सार्वजनिक ठिकाणी आनंदोत्सवाला मर्यादा येणार आहेत. तीस डिसेंबरला बुधवारी मांसाहाराचा बेतही यंदा अनेक ठिकाणी नसेल. कारण या दिवशी रेणुका देवीची सौंदत्ती यात्रा आहे. ही यात्रा यंदा रद्द झाली असली तरी त्यानिमित्ताने पाळली जाणारी परंपरा घरोघरी जपली जाणार आहे तर 29 डिसेंबरला मंगळवारी दत्त जयंती आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या निमित्ताने 27 डिसेंबरलाच बहुतांश ठिकाणी मांसाहारावर ताव मारला जाणार आहे.
हेही वाचा - कार्यकर्त्यांना पोलिसांनी मार्गात अडविण्याचा प्रयत्न केला तर मराठा समाज स्वस्थ बसणार नाही -
संपादन - स्नेहल कदम
Web Title: Thirty First Party Year Thursday Its Veg Day Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..