कालावधी ठरवा, नियम कडक करा, पण जयसिंपूर सुरू करा...! 

tighten the rules, but start Jaisingpur ...!
tighten the rules, but start Jaisingpur ...!

जयसिंगपूर : नगरपालिकेकडून शहरात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी निश्‍नित न करता बंद केले होते. त्यांचा फटका सर्वसामन्य जनता व व्यवसायिकांना होत आहे. त्यामुळे कालावधी निश्‍चित करून नियम कडक करून तत्काळ शहर सुरू करावे, या मागणीसाठी शहरातील व्यापारी व विक्रेत्यांनी प्रशासनाला जाब विचारुन बाजारपेठ सुरु करण्याची मागणी केली. यानंतर नगराध्यक्षा डॉ. निता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी तातडीची बैठक घेऊन शुक्रवारपासून (ता. 10) सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंयत शहर सुरु करण्याचा निर्णय घेतला. 

नगराध्यक्षा डॉ. निता माने यांच्या दालनात व्यापारी आल्यानंतर शंकर नाळे म्हणाले,""ज्या भागात रुग्ण सापडला आहे. तो परिसर सील करा. हातावरची पोटं असलेल्या व्यवसायिकांना वेटीस धरू नका.'' 
चंद्रकांत जाधव-घुणकीकर म्हणाले,""गेल्या दोन महिन्यापासून व्यावसायिकांनी पालिकेला सहकार्य केले आहे. आता त्याचा अंत पाहू नका. अन्यथा जनता कोरोनापेक्षा उपासमारीने मरेल.'' 
आदम मुजावर म्हणाले,""जे व्यवसायिक नियम पाळत नाहीत अशांवर कारावाई करुन गुन्हे दाखल करावेत, पण बाजारपेठ सुरु करावी.'' 

निर्मल पोरवाल म्हणाले, पालिकेकडून जुजबी कारवाई केली जाते. दंडाची करवाई केली जात नसल्याने पुन्हा मागे तसे पुढे चालते. त्यामुळे सर्वजण नियम पाळण्यासाठी नियम कडक करावे.'' नगरसेवक सर्जेराव पवार यांनी व्यवसासिकांची बाजू सांगून नियम पाळुन शहर सुरू करण्याचा निर्णय घ्यावा असे प्रशासनाला सांगितले. 

या वेळी नगराध्यक्षा डॉ. माने, मुख्याधिकारी टिना गवळी, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, राहुल बंडगर, बजरंग खामकर, यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. शुक्रवारपासून सकाळी नऊ ते सायंकाळी सात यावेळेत शहरातील बाजारपेठ सुरू करण्याचा निर्णय घेतला. बैठकीस दादा पाटील-चिंचवाडकर, अर्जुन देशमुख, मनोज पोरवाल, पांडू सारस्वत, पवन बरडीया, पंकज मानधना, योगेश पोरवाल, भरत पोरवाल यांच्यासह व्यवसायिक उपस्थित होते. 

दृष्टिक्षेप 
- नगरसेवकांच्या उपस्थितीत नगरपालिकेत बैठक 
- कोरोना रूग्ण सापडल्यानंतर अनिश्‍चित कालावधीसाठी लॉकडाउन 
- जयसिंगपुरातील व्यापारी, व्यावसायिकांना फटका 
- शुक्रवारपासून सकाळी 9 ते सायकांळी 7 पर्यंत शहर राहणार सुरू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com