जोतिबा देवाची आजची सोहन कमळ पुष्पातील महापूजा 

Todays Sohan lotus flower worship of God Jyotiba
Todays Sohan lotus flower worship of God Jyotiba

जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता.पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची आज शारदीय नवरात्र उत्सवातील चौथ्या दिवशी सकाळी पाच पाकळी सोहन कमळा पुष्पातील महापूजा बांधण्यात आली. तर आदी माया चोपडाई देवीची गरुडा रूढ महापूजा बांधण्यात आली. मूळमाया यमाई देवीची कमळ पुष्पातील महापूजा बांधण्यात आल्या. या सर्व महापूजा समस्त दहा गावकर व पुजारी वर्ग यांनी बांधल्या.


जोतिबा डोंगराकडे निघालेल्या भाविकांना आज गिरोली गावाजवळ व चव्हाण तळे परिसरात पोलिसांनी अडविले. भाविकांनी तेथूनच हात जोडून परतीचा मार्ग धरला. 
दरम्यान, आज सकाळी दहा वाजता मानाचा उंट  घोडा सर्व देव सेवक यांच्या उपस्थितीत धूपारतीचा सोहळा ढोल, पिपाणी, सनई यांच्या गजरात मूळमाया श्रीयमाई मंदिराकडे गेला.
यावेळी देवस्थानचे अधिक्षक महादेव हिंडे श्रीचे पूजारी ग्रामस्थ उपस्थीत होते. 

सकाळी  हा सोहळा ज्योतिबा मंदिर ते मुख्य पायरी रस्ता मेन पेठ सेंटर प्लाझा या मार्गावरून गज गतीने गेला. या वेळी गावातील सुवासिनी महिलांनी सडा रांगोळी काढून या सोहळ्याचे स्वागत केले. या सोहळ्यात सहभागी असणाऱ्यांना काही ग्रामस्थांनी सुगंधी दुधाचे वाटप केले. यमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी बारा वाजता हा सोहळा पुन्हा मुख्य मंदिरात आला. त्यावेळी  प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली व या सोहळ्याची सांगता झाली. रात्री मंदिरात विविध धार्मीक कार्यक्रम होतील.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com