कोथिंबिरीपासून मोटारींपर्यंत ऑनलाईनची चलती

Touchless behavior UPI code also in vegetable market
Touchless behavior UPI code also in vegetable market

कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाउनमुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. याचा सर्वाधिक परिणाम व्यवहारांवर झाला आहे. कोरोनाच्या भीतीपोटी अनेकांनी  रोजचे व्यवहार देखील ऑनलाईन केले आहेत. यामुळे आता भाजी मंडईमधील कोथिंबीर खरेदीपासून ते अगदी लाखो रुपयांचे व्यवहार ‘टचलेस’ होताना दिसत आहेत.  


  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आणि संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात झाला. याचा सर्वाधिक परिणाम बाजारपेठ आणि तेथील व्यवहारावर झालेला दिसत आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता येऊन हळू हळू व्यवहार पूर्व पदावर येत आहेत. मात्र चलन हाताळण्याची जोखीम मात्र अनेकजण पत्करण्यास तयार नाही आहेत. यासाठी युपीआय ॲपची जोरदार चलती आहे. सर्व प्रकारच्या युपीआय ॲपच्या माध्यमातून सध्या बाजारपेठेतील सर्व व्यवहार सुरु आहेत.

भाजी मंडईमध्ये देखील युपीआयचे स्कॅनिंग कोड दिसू लागले आहेत. किराणा, पानपट्टी असो किंवा शॉपिंग मॉल सर्वच व्यवहारासाठी आता हा ऑनलाईन पर्याय स्वीकारण्यात आल्याचे चित्र आहे. नोटाबंदीनंतर ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी शासनाने विविध योजना राबवण्यात आल्या. मात्र उपभोक्‍त्यांची मानसिकता बदलण्यास मात्र अत्यल्प यश आले होते. कोरोनाच्या भीतीमुळेअनेकांनी चलन हाताळणे टाळल्याचे दिसून येत आहे. 

ऑनलाईन व्यवहाराने थेट संपर्क टाळता येतो शिवाय किरकोळ नुकसान आणि उधारीचे व्यवहार यामुळे आटोक्‍यात आले आहेत. बराच काळ बंद असणाऱ्या व्यवहारातून सावरताना रोख होणाऱ्या व्यवहारामुळे अधिक हातभार लागत आहे.
-अनिल यादव,  विक्रेता.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com