esakal | गोवा - बेळगावमधील संबंधात 'हा' ठरतोय अडथळा ; तोडगा काय निघेना....
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic problem on Chorla Highway due to a landslide goa belgum

बेळगाव-पणजी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतरच्या काळात अनमोड घाटातून होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गोवा - बेळगावमधील संबंधात 'हा' ठरतोय अडथळा ; तोडगा काय निघेना....

sakal_logo
By
चेतन लक्‍केबैलकर

खानापूर (बेळगाव) - गोवा आणि बेळगावचे व्यापारी संबंध अत्यंत नाजूक आहेत. भाजी आणि दूधाची निर्यात बेळगावातून होत असल्याने गोव्याला बेळगाववर अवलंबून राहावे लागते. परंतू अलिकडच्या काळात वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने या संबंधात व्यत्यय येत आहे. गतवर्षी पावसाळ्यात तब्बल 80 तास वाहतूक कोंडी झाली, तर यंदा केवळ एका महिन्यात दहा तास वाहतुकीचा बोजवारा उडाला. म्हादईच्या (गोव्यातील मांडवी) काठावरील प्रदेशात अलिकडे भाजीच्या उत्पादनाला सुरूवातही झाली आहे. त्यामुळे हे व्यापारी संबंध कितपत टिकून राहणार हा प्रश्नच आहे.

गेल्या वर्षीपासून वाहतुकीचे तीनतेरा

बेळगाव-पणजी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतरच्या काळात अनमोड घाटातून होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद होती. रामनगर ते गोवा हद्दीपर्यंतच्या महमार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी खानापूर- लोंढा रस्त्याचे काम रखडल्यामुळे यंदाही या मार्गावरील वाहतुकीला ब्रेक लागला आहे.चोर्ला महामार्ग हा गोयंकारांसाठी सोयीचा रस्ता असला तरी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांमुळे गेल्या वर्षीपासून वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत.

पाहा - व्हिडीओ : कोल्हापूर शहरात झाला भीषण अपघात ; सीसीटीव्हीत कैद झाला 'तो' थरार...

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे चोर्ला घाटात दरड कोसळून वर्षभरात तब्बल 80 तास वाहतुकीची कोंडी झाली होती. यंदा पहिल्याच पावसात दरड कोसळल्याच्या घटना दोन्ही महामार्गावर घडल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यंदा आतापर्यंत 10 तास वाहतूक कोंडी झाल्याचा आहे. यामुळे गोवा राज्य सरकारच्या बांधकाम विभागाचीही डोकेदुखी वाढली आहे. दरड कोसळण्याच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी गोवा सरकारकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. त्या तुलनेत कर्नाटक सरकार मात्र गाफील असल्याचे दिसून येते.
गोव्याशी असलेले बेळगावचे व्यापारी संबंध आबाधीत राखण्यासाठी दोन्ही राज्यांच्या बांधकाम विभागानी बेळगाव-पणजी आणि चोर्ला महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची गरज आहे. गेल्या कांही वर्षांपासून गोमंतकीयांची बेळगावमधील वर्दळ वाढली असून खानापूर तालुक्यातील रस्त्याशेजारील मार्केटींगला चांगले दिवस आले आहेत. पण, पावसाळ्यात होणाऱ्या वाहतूक बंदीचा परिणाम सर्वसामान्य विक्रेत्यांसह बेळगावमधील व्यवहारांवरही होत आहे.

वाचा - दीडशे वर्षांनंतर रायगडावरील हत्ती तलाव यंदा भरला काठोकाठ ; कशी घडली ही किमया ?

गोवा आणि कर्नाटक राज्य यांचे व्यापाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत सलोख्याचे संबंध फार पूर्वीपासून आहेत, त्याचे दाखले इतिहासाच्या दफ्तरात देखील आपल्याला सापडतात. परंतु गेल्या काही वर्षात गोवा आणि बेळगावला जोडणाऱ्या चोर्ला घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळत आहे. याला गोवा आणि कर्नाटक, दोन्ही राज्य जबाबदार आहेत. दोन्ही राज्याकडून ठोस असे कोणतेच उपाय केले जात नसल्याने प्रामुख्याने भाजी आणि दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतो. यासाठी दोन्ही राज्यांनी सविस्तर तोडगा काढून हि दरड कोसळण्याचे प्रकार थांबवले पाहिजेत.
-    विठ्ठल शेळके, सामाजिक अभ्यासक, केरी-गोवा

  संपादन - मतीन शेख

go to top