90 शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे प्रशिक्षण 

Training of silk farming to 90 farmers
Training of silk farming to 90 farmers

कोल्हापूर : यवतमाळ जिल्ह्यातील 90 निवडक शेतकरी शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात आले होते. जिल्हा रेशीम कार्यालय, रेशीम संचालनालयामार्फत या शेतकऱ्यांची निवड केली होती. 

जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या अर्थसाह्याने जिल्हा रेशीम अधिकारी पंडित चौगले यांचे मार्गदर्शनाखाली गणेश झलक यांचे नेतृत्वाखाली शेतकरी रेशीमशास्त्र विशेष प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. मन्ने आणि रेशीमशास्त्र इन्क्‍युकेशन केंद्र समन्वयक डॉ. ए. डी. जाधव यांच्या प्रयत्नाने राज्यभर शेतीला विद्यापिठात प्रशिक्षण दिले जाते. 

डॉ. जाधव यांनी तुती लगवड, किटक संगोपन धागा निर्मिती, मुल्यवर्धीत आदीवर मार्गदर्शन केले. डॉ. मन्ने यांनी रेशीम अळयांचे रोग, किड व्यवस्थापण बाबत माहिती दिली. डॉ. एस. आर. यंकची यांनी "एक झाड, एक अंडिपुंज' बाबत संवाद साधला. त्यानंतर शेतकऱ्यांना एमआयडीसी कागल येथील साई गोकुळ येथे तुती पाने कापणी तसेच कोश काढणी मशीनचे प्रात्यक्षिक दाखविले. तसेच यळगुड रेशीम ग्रामला भेट दिली. तेथील प्रगतशील रेशीम शेतकरी अप्पासो झुंजार, राजेंद्र बागल, शिवाजी जगताप आदींनी भेटीचे नियोजन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com