इचलकरंजीत त्रिशूल चौक कनेक्‍शनमधून 15 जण झाले पॉझिटिव्ह 

Trishul Chowk connection 15 people became positive
Trishul Chowk connection 15 people became positive

इचलकरंजी : शहरातील बीजेपी मार्केटमधील वृद्धाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. वृद्धावर येथील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये रविवारी अंत्यसंस्कार केले आणि सोमवारी रात्री वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची तारांबळ उडाली असून, मृत वृद्धाच्या नातेवाइकांसह अंत्यसंस्काराला गेलेल्या नागरिकांना आज विलगीकरण कक्षात दाखल केले. 

काही दिवसापूर्वी त्रिशूल चौक येथील वृद्धाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला होता. तत्पूर्वी त्यांचा स्वॅब तपासणीस घेतला होता. या वृद्धाच्या पार्थिवावर अंत्यविधी करीत असतानाच त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे अंत्यविधीसाठी गेलेल्या सर्व नागरिकांना थेट विलगीकरण कक्षात दाखल केले होते. या कनेक्‍शनमधून आतापर्यंत 15 जण बाधित झाले आहेत. 

वर्धमान चौकातील 73 वर्षीय वृद्धावर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मृतदेहावर रविवारी अंत्यसंस्कार केले; मात्र वृध्दाचा अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची तारांबळ उडाली. अंत्यसंस्कारला गेलेल्या नागरिकांसह नातेवाइकांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. त्यांचा स्वॅब तपासासाठी पाठविला आहे. 

शहरातील पाचवा मृत्यू 
कोरोना संसर्गाने आतापर्यंत शहरातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कोले मळा, कुडचे मळा, त्रिशूल चौक, महात्मा गांधी हाउसिंग सोसायटी यासह आता वर्धमान चौकातील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका वृद्धेचाही समावेश आहे. 

दृष्टिक्षेप 
- बीजेपी मार्केटमधील वृद्धाचा संसर्गाने मृत्यू 
- अंत्यसंस्कारानंतर आला अहवाल पॉझिटिव्ह 
- प्रशासनाची उडाली तारांबळ 
- अंत्यसंस्कारासाठी गेलेल्यांना केले क्वारंटाईन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com