अंगावर काढू नका क्षयरोग बरा होतो!

Tuberculosis is cured
Tuberculosis is cured

कोल्हापूर - पन्नाशी ओलांडलेल्या सुरलाबाई दिवसभर मोलमजूरी करीत मुलीच्या शिक्षणाला बळ देत होत्या. गेल्या दोन महिन्यात त्यांना कोरडा खोकला क्विचित रक्त मिश्रीत थुंकी पडली. वजन घटले, ताकद हरवली. तेव्हा सुरलाबाई पुरत्या घाबरल्या. काही तरी गंभीर झालय, उपचाराचा खर्च पेलवणार नाही अशा समजातून त्या दवाखान्यात जाणे टाळू लागल्या. एका आशा स्वयंसेविकेने त्यांना धीर देत दवाखान्यात नेले, तेथील तपासणीत त्यांना क्षयरोग झाल्याचे निदान झाले. पुढे सहा महिने औषधोपचारातून त्या ठणठणीत बऱ्या झाल्या. 

सुरेखाबाई गंभीर दुखणे गैरसमजा पोटी अंगावर काढत होत्या. त्या मुलीसोबत एकाच खोलीत राहत होत्या. तिलाही कोरडा खोकला होता. वजन घटलेले प्रकृती क्षीण होती तिनेही दुर्लक्षच केले होते. सुरलाबाई पाठोपाठ मुलगीची तपासणी झाली आणि तिलाही क्षयरोग झाल्याचे निदान झाले. दोघीही उपचाराने पूर्ण बऱ्या झाल्या. वजन वाढले, हरविलेली ताकद व जगण्याची इच्छा पून्हा बळकट झाली. वरील प्रातिनिधीक उदाहरण आहे. गेल्या दोन वर्षात जिल्हा क्षयरोग नियंत्रण विभागाच्या मोफत तपासणी व उपचारातून अशा जवळपास 4 हजार 627 व्यक्तींना क्षयरोग मुक्त झाल्या आहेत. अशा क्षयरोगीना शासकीय रूग्णालयात मोफत औषधे, गरजेनुसार संतुलीत आहार मोफत मिळाला आहे. त्याच्याच पुढील टप्प्यात याविभागामार्फत क्षयरोग शोध मोहीम सुरू आहे. 

याबाबत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी. कुंभार म्हणाल्या की, "" वेळीच निदान व औषधे घेतली तर क्षयरोग नक्की बरा होतो. अनेकजन औषध मध्येच सोडतात त्यांचा क्षय बळावतो त्यांनाही पून्हा शोधून उपचाराखाली आणले जाते. क्षयरोगाचे गंभीर स्वरूप असेल तर एमडीआरटीबी, सीबीनेट तपासणी व पुढे औषधे देऊन बरा केला जातो. दोन आठवड्यापेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप, छातीत दुखणे, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त पडणे अशा लक्षणांच्या व्यक्तींची क्षयरोग तपासणी मोहीम सुरू आहे. निदान झाल्यावर औषधोचार होणार आहेत.'' 

 2018 क्षयरोगी 2 हजार 769 ,(2 हजार 254 बरे झाले) 
2019 क्षयरोगी 2 हजार 373 , (2 हजार 373 बरे झाले) 

मोहीमेचे नियोजन असे 
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी ः कोल्हापूर जिल्ह्यात मोहिमे करीता 12 तालुक्‍यातील 3482726 लोकसंख्या व 696545 इतक्‍या घरातील सर्व व्यक्तींची तपासणी होईल. त्यासाठी एकुण 2846 पथके व 5692 इतके कर्मचारी कार्यरत आहेत. कोल्हापुर ग्रामीण मधील 100 % लोकसंख्या व शहरी भागातील 30% लोकसंख्या 14 दिवसात तपासली जाईल. आशा महिला स्वयंसेविका मार्फत हे काम होईल. उपनिरीक्षक एम. एच शेख यांनी दिली. दरम्यान या बलात्कार प्रकरणाने धामोड परिसरात खळबळ उडाली आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com