हुल्लडबाजी बेततेय जीवावर; कंदलगाव तलावात आठवड्यात दुसरा बळी

two boy dead in kolhapur kandalgaon dam
two boy dead in kolhapur kandalgaon dam

कंदलगाव - निसर्गरम्य परिसर, निळेजार पाणी आणि निर्जनस्थळ यामुळे कंदलगाव तलावाकडे तरूणाई आकर्षित होत आहे. तलावातील पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नसल्याने बिंदू चौक येथील प्रज्ञेश केले आणि जवाहरनगर (सरनाईक वसाहत) येथील ताहिर निशानदार या किशोरवयीन मुलांचा बळी गेला. 1982 साली पाणी साठविण्यास सज्ज झालेला गावचा तलाव हा अत्यंत रमणीय परिसर असून यातील पाणीसाठा हा वर्षभर असल्याने यातील पाण्याकडे तरुणांचा ओघ वाढत आहे. गेल्या सहा वर्षांत गावाबाहेरील शाळा, कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांचा बळी गेला आहे. पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने तलाव भरल्यावर तलावात 1.71 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असतो. एरवी शांत असणाऱ्या तलावामधील पाणी क्षेत्रात उंच-सखल खाचखळगे असल्याने अतिउत्साही नवख्या पोहणाऱ्यांना याचा अंदाज येत नाही. त्यामुळे असे अपघात घडत आहेत. 

तलाव परिसरातील शेतकऱ्यांकडून तलाव धोकादायक असल्याचे कल्पना देण्यात येते. मात्र शेतकऱ्यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून तरुणांची तासन्‌तास हुल्लडबाजी सुरू असते. अशा वेळ पोहता येत नसनाऱ्या मुलांचा मोह वाढून एकमेकांच्या हाताला धरून पोहण्याचा आनंद लुटत असतात आणि पाणी पातळीचा अंदाज न आल्याने असे बळी वाढत आहेत. 

तलाव आकाराने मोठा असल्याने अगदी वर्षभर तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा असतो. तलाव परिसर लोकवस्तीपासून थोडा दूर असल्याने या ठिकाणी सुभाष नगर, जवाहर नगर, राजेंद्र नगर तसेच शहर परिसरातून तरुणांचे लोंढे जेवनावळीसाठी दिवसभर रेंगाळत असतात. जेवण करताना व जेवण झाल्यावर मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेत दम लागेपर्यंत तलावात पोहतात. यात मद्यपी सुद्धा आघाडीवर असतात. 

हुल्लडबाजी नित्याची... 
निर्जनस्थळ ना भिती ना भय अशा वातावरणामुळे अगदी सकाळी दहा वाजल्या पासून बाटलीची बुचे निघतात आणि तर्रर अवस्थेत दिवसभर आंब्याच्या झाडाखाली चटईवर लोळत पडणे, असे प्रकार इथे नित्याचे झाले आहेत. 

वारंवार अशा घडणाऱ्या घटनेची ग्रामपंचायतीने दखल घेतली असून तलाव परिसरात जेवणावळी व मासेमारी तसेच पोहण्यासाठी बंदी घालण्यात येत आहे. असे प्रकार आढळल्यास दंडात्मक तसेच पोलिस कारवाई करण्यात येणार आहे. 
- उत्तम पाटील, उपसरपंच, कंदलगाव. 

तलाव परिसरात होणाऱ्या जेवणावळी व मद्यपी विषयी पोलिसांत तक्रारी आहेत. जेवणावळी करताना कोण सापडल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. 
- सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक, गोकुळ शिरगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com