राधानगरी धरणाचे 2 दरवाजे उघडले ; 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात

Two gates of Radhanagari dam opened kolhapur
Two gates of Radhanagari dam opened kolhapur

राधानगरी - सलग तीन दिवसाच्या अतिवृष्टीने राधानगरीचे 'लक्ष्मी' धरण आज पूर्ण क्षमतेने भरले. सायंकाळी सात वाजता सात स्वयंचलित दरवाजांपैकी दोन खुले झाले. यातून 2856 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पत्रात सुरू झाला आहे. स्वयंचलित दरवाज्यातून आणि वीज निर्मितीसाठी 1400 असे एकूण  4256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने भोगावती सह पंचगंगा नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी धरणाच्या एकूण क्षमतेच्या 347.50 फूट पैकी 347.45 फूट इतकी पाणीपातळी आल्यानंतर स्वयंचलित सात दरवाजा पैकी तीन आणि सहा क्रमांकाचा दरवाजा खुला झाला. गतवर्षी 31 जुलैला हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. तेव्हा 2764 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा जुलै महिन्यामध्ये चक्क पंधरा दिवस उघडीप दिल्याने हे धरण 5 दिवस उशिरा भरले आहे. आज अखेर या धरणक्षेत्रावर 2652 मिलिमीटर इतका पाऊस नोंदला आहे. सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने गतवर्षीच्या पावसाची सरासरी गाठली आहे. 

पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने आज सायंकाळ पासूनच कोणत्याही स्थितीत स्वयंचलित दरवाजे खुले होतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तीनच दिवसात तब्बल साडेतीन टीएमसी पाणी साठा होऊन हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

दरम्यान काळम्मावाडी धरण क्षेत्रात आजही मुसळधार पाऊस सुरू राहिला. गेल्या 24 तासात येथे अतिवृष्टी झाली. 255 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून हे धरण सांडवा पातळी पर्यंत भरले आहे. सध्या याची पाणीपातळी 641 मीटर इतकी झाली असून हे धरण पूर्ण क्षमतेने 645 मीटर पातळीला भरते. सध्या या धरणांमध्ये 20.18 टीएमसी पाणी संचय झाला असून 80 टक्के झाले आहे. अद्याप साडेचार टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पावसाचा विचार करून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी या धरणाच्या पायथ्याला असलेल्या वीज घरातून एक हजार क्‍युसेक पाणी दूधगंगा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. आजवर या धरण क्षेत्रामध्ये 20 88 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. यासह तुळशी धरण क्षेत्रावर गेल्या 24 तासात 216 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हे धरण दोन पॉईंट सोळा एम सी म्हणजे 67 टक्के इतके भरले आहे. 

72 मिलिमीटर पावसाची नोंद

राधानगरी धरण व पाणलोट क्षेत्रात आज काहीशी उघडीप दिसून आली असली तरी अतिवृष्टी कायम आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत आठ तासात 72 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com