हुपरीत खोदकाम करताना आढळून आल्या 'या' जुन्या मूर्ती...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

शहरातील अतिशय जुन्या श्री 1008 चंद्रप्रभु जैन मंदिराच्या जिर्नोध्दाराचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

हुपरी - येथे गावभागातील श्री 1008 चंद्रपभु मंदिराच्या जिर्नोध्दारासाठी खुदाई करत असताना पार्श्वनाथ भगवंतांच्या दोन मुर्त्या आढळून आल्या. मुर्त्या अंदाजे इ.स.पुर्व 1200 वर्षपूर्वीच्या असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. मूर्तीच्या खाली कन्नड भाषेत मजकूर कोरलेला आहे.

शहरातील अतिशय जुन्या श्री 1008 चंद्रप्रभु जैन मंदिराच्या जिर्नोध्दाराचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मंदिरातील गर्भ गृहाच्या पुढे असणाऱ्या कलश मंडप मध्ये आज सकाळी खुदाई चालू असताना तीन ते चार फुटांवर या मुर्त्या दिसून आल्या.

वाचा - म्हणुन 'या' तहसीलदारांनी चक्क चिखलात उतरून केली भाताची लागण...

या मुर्त्यांना अभिषेक घालून विधिवत त्यांची पुजा करण्यात आली. मुर्त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two idols of Lord Parshvanath were found in hupari

Tags
टॉपिकस
Topic Tags: