हुपरीत नगरसेवक व नगरसेविकेचे पती यांच्यात झाली फ्री स्टाईल हाणामारी...

two person freestyle fight in hupari Municipality kolhapur
two person freestyle fight in hupari Municipality kolhapur

हुपरी (कोल्हापूर) - येथे गटर बांधकाम करण्याच्या कारणावरुन एक नगरसेवक व दुसर्या नगरसेविकेचे पती यांच्या मध्ये एकमेकांना शिविगाळ करत जोरदार हाणामारी झाली. पालिकेच्या बांधकाम विभाग दालनातच कर्मचारी व दैनंदिन कामकाजासाठी आलेल्या नागरिकांसमोर भरदुपारी हा प्रकार घडला. एकमेकांची कपडे फाडण्यापर्यंत घडलेल्या फ्री स्टाईल हाणामारीच्या या प्रकाराची उलट सुलट चर्चा होत आहे. दरम्यान, या संदर्भात हुपरी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांनी सांगितले.

पालिके तर्फे प्रभाग क्रमांक तीन मधील राजगुरु नगर भागात गटर चे बांधकाम करण्यात येत होते. प्रस्तुतचे काम मंजूर ठिकाणा ऐवजी दुसऱ्याच तसेच अनावश्यक ठिकाणी होत असल्याच्या कारणावरून विरोध करणारे तर मंजूर कामाला अनाठायी विरोध का? या कारणावरून समर्थन करणारे असे दोन मतप्रवाह निर्माण झाले. त्यातून स्थानिकांत वाद निर्माण झाला.

ही बाब समजताच प्रभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका नगरसेवकांने गटारीच्या समर्थनार्थ तर नगरसेविका पतीने विरोधार्थ भुमिका घेतली. परिणामी वाद वाढत गेला.

दुपारी पालिकेच्या बांधकाम विभागाच्या दालनात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असतानाच दोघांत पुन्हा शाब्दिक चकमक उडाली. एकमेकांच्या अंगावर धावून जात लाथाबुक्यानी मारहाण केली. मारहाणीत दोघांच्याही अंगावरील कपडे फाटली गेली. मोठ्या आवाजात सुरू असलेल्या भांडणामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी उपस्थितांनी हस्तक्षेप करीत भांडण सोडवून दोघांनाही दुर केले.

यावेळी पालिकेच्या आवारात नगरसेवक व नगरसेविका पतीच्या नातलग तसेच समर्थकांनी गर्दी केली होती. दरम्यान, पोलीस येताच गर्दी पांगली .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com