पावसामुळे कोल्हापुरातील दोन वाहतूक मार्ग बंद

Two road closed Kolhapur
Two road closed Kolhapur

कोल्हापूर : पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग 1 व प्रमुख जिल्हा मार्ग 1 असे 2 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता म. भाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी असल्याने वाहतूक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे. 
कागल तालुक्यातील बिद्री सोनाळी-सावर्डे बु. गोरंबे आनूर बस्तवडे प्रजिमा क्र.46 मार्गावरील बस्तवडे बंधाऱ्यावर 3  फूट पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. पर्यायी इजिमा क्र. 189 अनुर ते बानगे व इजिमा क्र. 93 बानगे मार्गे वाहतूक सुरू आहे.

पावसाची उघडीप
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज थोडीशी विश्रांती घेतली आहे. 

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे. कासारी नदीवरील- यवलूज. वेदगंगा नदीवरील-वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली. वारणा नदीवरील -माणगाव व चिंचोली. दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे, कसबा वाळवे, सुळकुड व दत्तवाड असे एकूण 26 बंधारे पाण्याखाली आहेत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com