शिक्षकांच्या चाचणीसाठी गडहिंग्लजला दोन हजार किट

Two Thousand kits To Gadhinglaj For Teacher Corona Testing Kolhapur Marathi News
Two Thousand kits To Gadhinglaj For Teacher Corona Testing Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : कोरोनाच्या मोठ्या ब्रेकनंतर 23 नोव्हेंबरपासून शाळांची घंटा वाजणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मार्गदर्शक सूचनानुसार शिक्षकांच्या कोरोना चाचणीला आजपासून सुरवात झाली. पहिल्या दिवशी 98 शिक्षकांची चाचणी पूर्ण झाली आहे. दोन दिवसांत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या संपविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने दोन हजार किट उपलब्ध केले आहेत. 

मागील शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तेव्हापासून शाळांना कुलपे लागली. नव्या शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र संपले तरी तीच परिस्थिती कायम होती. पण, आता कोरोनाचा कहर कमी झाला आहे. त्यामुळे शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिक्षकांची कोरोना चाचणी हा त्याचाच एक भाग आहे. 

गडहिंग्लज तालुक्‍यात एकूण 1013 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. त्यांच्या कोरोना चाचणीला आजपासून सुरवात झाली. शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथील कोविड केअर सेंटरमध्ये ही चाचणी घेतली जात आहे. आज पहिल्या दिवशी 98 शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. येत्या दोन दिवसात सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण व आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. एकाचवेळी गर्दी होऊ नये यासाठी केंद्रनिहाय शिक्षकांना दिवस व वेळ ठरवून दिली आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी दीड आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच या कालावधीत स्वॅब घेतले जाणार आहेत. 

तूर्तास गृह अलगीकरणात... 
कोरोना चाचणीनंतर अलगीकरणात राहणे आवश्‍यक असते. चाचणी झालेल्या शिक्षकांचे सध्या गृह अलगीकरण केले आहे. हा कालावधी पाच दिवसांचा करण्यात आला आहे. चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या शिक्षकांचे संस्थात्मक अलगीकरण केले जाणार आहे. चाचणीत काही शिक्षक पॉझिटिव्ह आढळले तर त्यांच्या संपर्कातील लोकांचीही चाचणी करावी लागेल. ही शक्‍यता गृहीत धरून तपासणीचे किट जादा उपलब्ध करण्यात आले आहेत. 

चाचणीचे नियोजन असे... 
शुक्रवारी (ता.20) सकाळी साडेदहा ते दुपारी दीडपर्यंत कडगाव, बेळगुंदी, हेब्बाळ, भडगाव केंद्रातील तर दुपारी तीन ते पाच या कालावधीत नूल व नेसरी केंद्रातील शिक्षकांची चाचणी केली जाणार आहे. शनिवारी (ता.21) सकाळच्या सत्रात हडलगे, हिडदुगी केंद्रासह शहरातील शाळांच्या शिक्षकांची तर सायंकाळच्या सत्रात महागाव व हलकर्णी केंद्रातील शिक्षकांची चाचणी होणार आहे. 

बसफेऱ्या वाढणार का? 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटी महामंडळाने बसफेऱ्या थांबविल्या होत्या. टप्प्याटप्प्याने बसफेऱ्यांची संख्या वाढविली आहे. पण, अद्यापही पूर्ण क्षमतेने फेऱ्या सुरू नाहीत. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे एसटी आगाराकडून बसफेऱ्या वाढविणे आवश्‍यक आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com