कोरोनाचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर सावट

Uncertainty shadows over six school national sports events
Uncertainty shadows over six school national sports events

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात होणाऱ्या सहा शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. या स्पर्धा होणार की नाही, हे सांगता येणे कठीण झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धा रद्द झाल्या तर संघांतील खेळाडूंची मेहनत वाया जाणार आहे. त्याचबरोबर उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे व क्रीडा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाला खो बसण्याची शक्यता आहे. 

यंदा कोल्हापुरात मॉडर्न पेंटॅथ्लॉन, पुण्यात वाटरपोलो, रब्बी, हाॅकी, ज्युदो तर यवतमाळमध्ये शुटींग बॉल या  खेळांच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा एप्रिलमध्ये नियोजित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने ३१ मार्चपर्यंत सुट्ट्या जाहीर केल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाचे सावट अजूनही गडद असल्याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे काय होणार, अशी विचारणा खेळाडूंतून होत आहे. या खेळाडूंचा सरावही बंद झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबला नाही तर क्रीडा खात्याला या स्पर्धा रद्द करण्याची वेळ येणार आहे. 

विशेष म्हणजे या विविध खेळांच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांनी जीवतोड मेहनत घेत राष्ट्रीय स्तरावर धडक मारली मारली आहे. राष्ट्रीय स्तरावर यश मिळविल्यानंतर खेळाडूंना शिष्यवृत्ती मिळते. या खेळांच्या स्पर्धा झाल्या नाही तर खेळाडूंना शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे. यासह राज्यातील जिल्हा क्रीडा कार्यालयांतर्फे उन्हाळी क्रीडा शिबिर घेतले जाते. या शिबिरांतून त्या-त्या जिल्हा क्रीडा कार्यालयातील मार्गदर्शक त्यांच्या खेळातील डावपेच खेळाडूंना शिकवतात. यंदा उन्हाळी शिबिर होण्याची कमी आहेत. शाळेतील क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचा विशेष कार्यक्रम घेतला जातो. त्यातून विविध खेळासंबंधीचे मार्गदर्शन क्रीडा कार्यालयातर्फे केली जाते. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "कोल्हापुरात मॉडर्न पेंटॅथलॉन या राष्ट्रीय स्पर्धेची तयारी सुरू होती. कोरोनामुळे ही स्पर्धा होईल की नाही हे अनिश्चित आहे. तूर्त या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे म्हणावे लागेल."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com