'या' टोळीकडून अंदाज चुकला, तर एक लाखाचे बक्षीस...

uncharted abortion diagnosis gangs in kolhapur marathi news
uncharted abortion diagnosis gangs in kolhapur marathi news

कोल्हापूर : बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीकडून अंदाज चुकला, तर एक लाखाचे बक्षीस देण्याची ग्वाही दिली जाते. या आमिषाला बळी पडून अनेक जण या टोळीच्या जाळ्यात फसले आहेत; पण सांगितल्याप्रमाणे मुलगा किंवा मुलगी झालीच नाही तर बक्षीस देण्यासाठी मात्र वाद घालून पोलिसांना सांगण्याची धमकी या टोळक्‍याकडून दिली जात आहे. 

दरम्यान, विशेषतः मुलगाच आहे का,  यासाठीच या टोळीच्या जाळ्यात अडकलेल्या दाम्पत्याकडून तपासणी केली जाते; पण मुलगी असेल तर गर्भपात करण्याचे वेगळे पैसे आकारले जातात. हे गर्भपातही दुसऱ्या ठिकाणी करून त्यासाठी १५ ते २० हजार रुपये उकळले जातात. 

अंदाज चुकला, तर लाखाचे बक्षीस ​

या टोळीचे काही एजंट शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरत आहेत. त्यांना पहिल्यांदा संपर्क करून व्यवहार ठरवला जातो. याची वाच्यता कोठेही न करण्याचा शब्द दाम्पत्याकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून घेतला जातो. गर्भलिंग निदान चाचणी करणे कायद्याने गुन्हा आहे. गर्भलिंग चाचणी करताना कोणी सापडलाच तर चाचणी करणाऱ्यांबरोबरच चाचणी करून घेणाऱ्या दाम्पत्यांवरही कायद्याने गुन्हा दाखल होताे; पण यात दाम्पत्यही सहभागी आहे, हे दाखवण्यासाठी संबंधित पती-पत्नीचे आधारकार्ड, पॅनकार्ड या टोळीकडून पहिल्यांदाच घेतले जाते. त्यानंतर २५ हजाराची रक्कम स्विकारून ज्यादिवशी गर्भलिंग चाचणी करायची त्याची तारीख सांगून ठरलेल्या ठिकाणी येण्यास सांगितले जाते. 

कागदपत्रे आणि पैसे दिल्यानंतर एका वाहनातून ज्या महिलेची गर्भलिंग चाचणी करायची आहे तिला ठरलेल्या ठिकाणी नेले जाते. तिच्यासोबत पतीला किंवा इतर नातेवाईकांना नेले जात नाही, त्यांना रंकाळा उद्यानात किंवा आजूबाजूच्या परिसरातच थांबण्याची सुचना दिली जाते. साधारण दोन तासांनी तपासणी करून संबंधित महिलेना पुन्हा तिच्या पतीसोबत सोडले जाते. सोडताना एका कागदावर मुलगी असेल तर ‘एफ’ आणि मुलगा असेल तर ‘एम’ लिहलेली चिठ्ठी दिली जाते.

हाच तो रिपोर्ट 
एखाद्या दाम्पत्याला पहिल्या दोन मुलीच असतील आणि पुन्हा मुलगीच असेल तर संबंधित महिलेची नोंदणी एखाद्या रूग्णालयात केली असेल तर अशा महिलेचा गर्भपात करण्याची जबाबदारी या टोळीकडून घेतली जात नाही. पण रूग्णालयात नोंदणी नसेल तर गर्भपातासाठी पुन्हा १५ ते २० हजार रूपये संबंधित दाम्पत्यांकडून उकळले जातात. हे गर्भपात एखाद्या ग्रामीण भागातील गावांत ओळखीच्या घरात केले जातात, त्याचीही वाच्यता होणार नाही अशी खबरदारी घेतली जाते.

रात्रीस खेळ चाले
या टोळीकडून झालेल्या तपासणीत पुन्हा मुलगीच असेल तर संबंधित महिलेचा गर्भपात रात्री किंवा पहाटे केला जातो. शहरातील एका मोठ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा डॉक्‍टर या गर्भपात मोहिमेत आघाडीवर असल्याचे समजते. फुलेवाडी येथील एका शासकीय कर्मचाऱ्यांच्या कॉलनीत किंवा या परिसरात लागून असलेल्या खेडेगावात मध्यरात्री किंवा पहाटे या डॉक्‍टरच्या पुढाकारानेच गर्भपातही केला जातो.

मुलींची संख्या घटलेलीच (तालुकानिहाय जन्म दर असा)

तालुका    २०१५       २०१६        २०१७       २०१८      २०१९ 
आजरा     ९६५         ९५०          ९५०        ९६१         ९३६
भुदरगड    ९२१         ९१०         ९१६         ९१९         ९१९
चंदगड     ९८३          ९८८         ९८७         ९९३         ९८१
गडहिंग्लज    ९६३      ९६३         ९५४        ९६३         ९३३
गगनबावडा    ९५०     ९८०         ९९४        ९८४         ९७८
हातकणंगले    ९४१     ९२९        ९३१         ९५४         ९४९
कागल           ९२९      ९२२        ९३४         ९३०        ९२०
करवीर          ८६५      ८८०         ९१२         ९००        ८९५
पन्हाळा        ८९०      ९११          ९२३         ९२४        ९०७
राधानगरी     ९१७       ९२३         ९३१         ९१३         ९०१
शाहुवाडी      ९८२        ९४७         ९४८        ९५७          ९४७
शिरोळ        ९०७        ९३२         ९०४         ९१७          ९०५
एकूण         ९२४        ९२७        ९३१          ९३३           ९२५
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com