उत्तूरला चार महिन्यात 14 अपघात, दोघांचा मृत्यू

Uttur Had 14 Accidents In Four Months, Killing Two Kolhapur Marathi News
Uttur Had 14 Accidents In Four Months, Killing Two Kolhapur Marathi News

उत्तूर : उत्तूर-गडहिंग्लज रस्त्यावरील स्मशानभुमीजवळील चौकात चार महिन्यात छोटे मोठे चौदा अपघात झाले. यामध्ये दोन युवकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे या ठिकाणी सुचना फलकासह क्रश बेरियर बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

कोल्हापुरहून गोव्याकडे जाण्यासाठी सोयीचा (शार्टकट) मार्ग आहे. यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. कोल्हापुरहून आलेली वाहने भरधाव वेगाने येतात. चौकातून एक रस्ता उत्तूर गावात, तर दुसरा गोव्याकडे जातो. मात्र याठिकाणी आल्यावर वाहनचालकाच्या नेमका रस्ता कुठे जातो हे समजत नाही.

गोंधळलेल्या अवस्थेत वाहनचालक एकतर करकचून ब्रेक मारतात किंवा वाहन जोरात वळविण्याचा प्रयत्न करतात. यामुळे बऱ्याचवेळा याठिकाणी अपघात होतात. वाहनांच्या वेगावर नियंत्रण यावे म्हणून येथे छोट्या आकाराचे स्पीड ब्रेकर बसवले आहेत, मात्र वाहनांच्या वेगापुढे ते तकलादू ठरत आहेत. 14 जानेवारीला झालेला अपघातात रोहीत कुडाळकर या युवकाचा मृत्यू झाला. या चौकात आल्यावर चालकाने ब्रेक मारला यामुळे गाडी समोरच्या गटारीत जावून दोन तीन वेळा पलटी झाली.

याठिकाणी क्रश बेरीयर असते, तर कदाचित अपघाताची तीव्रता कमी होवून युवकाचा जीव वाचला असता. या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर 29 डिसेंबरला झालेल्या अपघातात ओंकार पाटील हा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी ठार झाला. याठिकाणी दररोज किरकोळ अपघात होतात. वाहनांचे मोठे नुकसान होते. नागरीक जखमी होतात. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेजे बनले आहे. 

मंत्री मुश्रीफ यांच्याकडून सुचना 
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ शनिवारी (ता.16) उत्तूर दौऱ्यावर आले असता या चौकातील अपघाताबाबत आजरा साखर कारखान्याचे संचालक मारुतीराव घोरपडे व माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल उत्तूरकर यांनी त्यांच्याजवळ चिंता व्यक्त केली. यावर ताबडतोब उपाययोजना करावी, अशी सुचना मंत्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

दिशादर्शक फलक बसवावेत
याठिकाणी मोठे दिशादर्शक फलक बसवावेत. रस्त्याच्या साईडला व वळणावर रिफ्लेक्‍टर बसवावेत. 
- सचिन उत्तूरकर, उपसरपंच, उत्तूर 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com