"उत्तूर'चे विद्यार्थी करणार विमानाने प्रवास

अशोक तोरस्कर
गुरुवार, 23 जानेवारी 2020

उत्तूर येथील उत्तूर विद्यालयातील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी शाळेने उपलब्ध करून दिली. 26 जानेवारीला होणारे दिल्लीतील ध्वजारोहण व ध्वजसंचलन पहाण्यासाठी ही सहल आयोजित करण्यात आली आहे. दिल्ली ते मुंबई हा परतीचा प्रवास ते विमानाने करणार आहेत. मंगळवारी हे विद्यार्थी दिल्लीकडे जाण्यासाठी रवाना झाले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्याना शुभेच्छा दिल्या. पहिल्यांदा विमानात बसणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आनंद होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. 

उत्तूर : येथील उत्तूर विद्यालयातील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी शाळेने उपलब्ध करून दिली. 26 जानेवारीला होणारे दिल्लीतील ध्वजारोहण व ध्वजसंचलन पहाण्यासाठी ही सहल आयोजित करण्यात आली आहे. दिल्ली ते मुंबई हा परतीचा प्रवास ते विमानाने करणार आहेत. मंगळवारी हे विद्यार्थी दिल्लीकडे जाण्यासाठी रवाना झाले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्याना शुभेच्छा दिल्या. पहिल्यांदा विमानात बसणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आनंद होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. 

विमानातून सहलीला जाणेसाठी सहा महिन्यापासून नियोजन केले. यासाठी विद्यार्थ्यांची बचतगट तयार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी बचत करून यामध्ये पैसे जमा केले. उत्तूर ते दिल्ली व परतीच्या प्रवासाचे नियोजन करण्यात आले. मंगळवारी (ता.21) हे विद्यार्थी कोल्हापूरला रवाना झाले. कोल्हापूर ते मिरज हा प्रवास व मिरज ते आग्रा हा प्रवास रेल्वेने करणार आहेत.

25 तारखेपर्यंत इंडिया गेट, लालकिल्ला, कुतूब मिनार, जामा मशीद, हूमायून मकबरा, वृदांवन गार्डन, ताजमहल, बुलंद दरवाजा, जोदाबाई महल, इत्यादी पर्यटन स्थळे पाहणार आहेत. 26 जानेवारीला होणारे ध्वजवंदन व ध्वजारोहण पाहणार आहेत. यासाठी केंद्र शासनाची परवानगी घेण्यात आली आहे. यानंतर 26 जानेवारीला दिल्ली ते मुंबई हा दोन तासाचा विमान प्रवास ते करणार आहेत. मुंबईमधील प्रेक्षणीय स्थळे पाहून ते कोल्हापूरपर्यंत रेल्वेने प्रवास करणार आहेत. 

विद्यार्थ्यांची इच्छा सत्यात 
शाळेतील पटांगणावर खेळताना एखादे विमान अथवा हेलीकॉप्टर गेले, तर विद्यार्थी कुतूहालने पहातात. त्यांना आकाशात उडणाऱ्या विमानांचे नेहमीच आकर्षण असते. काही विद्यार्थ्यांनी विमानात बसण्याची इच्छा बोलून दाखवली. यानुसार नियोजन करून विमानातील सफर सहलीचे आयोजन केले. संस्थेचे सचिव अनंतराव आजगावकर, मुख्याध्यापक राजेंद्र ठाकूर यांचे मार्गदर्शन यासाठी लाभले. 
- इंद्रजित बंदसोडे, शिक्षक 

बचतीची सवय 
वर्षभरापुर्वी आमच्या आंतरभारती शिक्षण संस्थेतील चिमणे विद्यालयातील विद्यार्थी विमानाने सहलीला गेले होते. विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी व त्यातून नवीन उपक्रम सुरू व्हावेत यासाठी बचत गटाच्या माध्यामातून हे प्रयोग सुरू आहेत. 
- राजेंद्र ठाकूर, मुख्याध्यापक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttur Ttudents Will Travel By Plane Kolhapur Marathi News