उत्तूरच्या "निर्मिती'चा प्रवास लोकल ते ग्लोबल

Uttur's Nirmiti Circle Now Online Kolhapur Marathi News
Uttur's Nirmiti Circle Now Online Kolhapur Marathi News

उत्तूर : क्रियाशील सामाजिक कार्यातून कोल्हापूर जिल्ह्यात लौकिकपात्र ठरलेल्या उत्तूर येथील निर्मिती युवा परिवार हे मंडळ आता ग्लोबल झाले आहे. मंडळाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा आणि भविष्यातील उपक्रम याबाबतची माहिती देणारी वेबसाईट मंडळाने सुरू केली आहे. नुकतेच या वेबसाईटचे लोकार्पण नारी शक्तीच्या हस्ते करण्यात आले. 

समाज बदलासाठी युवा शक्ती हे ब्रीद घेऊन गेली 24 वर्षे निर्मिती युवा परिवार विधायक काम करत आहे. वर्षातील बारा महिने बारा उपक्रम हे "निर्मिती'चे वैशिष्ट्ये आहे. प्रबोधनपर गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश म्हणून मूर्ती दान, निर्माल्य संकलनासाठी पुढाकार, राज्यस्तरीय पोस्टर निर्माण स्पर्धा, राज्यभर चर्चेत असणारी किल्ला स्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर, दहावी-बारावी परीक्षार्थींसाठी मनोविकास कार्यशाळा, शाळकरी मुलांच्या आवडी-निवडींना व्यासपीठ देण्यासाठी बालआनंद मेळा, गरजू विध्यार्थी वर्गासाठी मोफत पुस्तक पेढी, प्रतिथयश लेखक - कवी यांची थेट शाळा भेट, विविध सामाजिक प्रश्‍नी जनजागरण अभियान अशा उपक्रमांद्वारे निर्मितीने जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

आता निर्मितीने www.nirmitiuttur.com ही वेबसाईट सुरू केली आहे. वेबसाईटवर नावीन्यपूर्ण, उपयुक्त, वैविध्यपूर्ण पेजेस उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या विषयांवर वेबिनारही घेतले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष महादेव मिसाळ यांनी दिली. वेबसाईटचे लोकार्पण सरपंच वैशाली आपटे, मीनाक्षी तौकरी, भारती देशमाने, तेजल पोकळे यांच्या हस्ते झाले.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, डॉ. प्रकाश तौकरी, चंद्रशेखर आमणगी, विजय पाकले, उमेश पोकळे, किरण आमणगी, संजय धुरे, महेश करंबळी, मंदार हाळवणकर, प्रकाश जाधव, पाटकर, बंडसोड आदी उपस्थित होते. या वेळी वेबसाईट तयार केल्याबद्दल पुष्कर देशमाने यांचा सत्कार केला. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com