कोल्हापुरात शनिवारपासून लसीकरण 

Vaccination from Saturday in Kolhapur
Vaccination from Saturday in Kolhapur

कोल्हापूर - कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आज येथे दाखल झाली आहे. येथून या लशीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली जिल्ह्यासाठीही दुपारी रवाना करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधासाठीचे लसीकरण येत्या शनिवारी (ता.16) पासून सुरू होणार आहे. 

कोल्हापूर शहरात सहा तर ग्रामीण भागातील आठ केंद्रांवर लसीकरण होईल. एका दिवसात 1400 जणांना लस टोचण्यात येईल. त्यासाठी सीपीआर रूग्णालयासह अन्य 13 ठिकाणी स्वंतत्र कक्ष तयार केले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी दिली. पहिल्या टप्प्यात कोरोना योध्द्यांना लस टोचण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. एका केंद्रावर कमीत कमी शंभर लाभार्थ्यांना लसीकरण होणार आहे.

त्यासाठी आशा व वैद्यकीय कर्मचारी वर्गाने यापूर्वी केलेल्या सर्व्हेचा आधार घेतला जाईल. यात गेल्या आठ महिन्यात शासकीय स्तरावर कोरोनायोध्दा म्हणून काम केलेल्या वैद्यकीय कर्मचारी, डॉक्‍टर्स यांना प्राधान्याने लस देण्यात येईल. त्यासोबत विविध शासकीय विभागातील कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी यांनाही लसीकरणाचा लाभ देण्यात येणार आहे. 

 
असे होईल लसीकरण 
पहिल्या कक्षात ः कोविन सॉप्टवेअरमध्ये लाभार्थ्यांचे नोंदणी होईल. नोंदणीनंतर संबधित लाभार्थ्याला एक दिवस आदी मोबाईलवर संदेश पाठविला जाईल. त्यात किती वाजता कोणत्या केंद्रावर लसीकरण आहे, याची माहिती असेल. संबंधित व्यक्ती लसीकरणासाठी आल्याची येथे नोंद होईल. 

दुसऱ्या कक्षात ः संबधित लाभर्थ्यांचे तापमान, तसेच ऑक्‍सिजनची पातळी, तपासली जाईल. त्यानंतर निर्जुंतूकीकरण होईल. त्यानंतर लाभार्थ्यांला लसीकरण कक्षात प्रवेश असेल. 

तिसऱ्या कक्षात ः दोन वैद्यकीय कर्मचारी नोंदणीकृत लाभार्थी तोच आहे का, याचे ओळखपत्र पाहून खात्री करून घेतील. त्यांची नोंद कोविन ऍपमध्ये होईल. 

चौथ्या कक्षात ः लसीकरण कक्षात लसीकरण प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून संबधित लाभार्थीला इंजक्‍शनव्दारे लस टोचली जाते. हेच कर्मचारीला लसीबाबत माहिती देतील. 

पाचव्या कक्षात ः लसीकरणानंतर प्रत्येक लाभार्थ्याला अर्धा तास या कक्षात विश्रांती दिली जाईल. तसेच त्या लाभार्थ्याच्या प्रकृतीवर निरीक्षण केले जाईल. काही त्रास झाल्यास उपचारासाठी स्वतंत्र किट येथे उपलब्ध असेल व झालेल्या त्रासांची नोंदही घेतली जाईल. 
एका व्यक्तीस लस देण्यासाठी सहा मिनिटांचा वेळ आहे. या व्यतिरिक्त अर्धा तास विश्रांती व निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com