कसं चालू आहे व्हॅलेंटाईनचे प्लॅनिंग...?

ऋषीकेश राऊत
Wednesday, 12 February 2020

स्वत:चा वेगळा व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी प्रेमवीरांचे प्लॅनिंग सुरू असून यंदा नवे फंडे आजमावले जाणार का? हे पहायला मिळणार आहे.

इचलकरंजी - प्रेम जीवांसाठी आता व्हॅलेंटाईन वीकची उत्कंठा वाढली आहे. तरुणाईची बदलती व वाढती मागणी कॅश करण्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. व्हॅलेंटाईन स्वागतासाठी तरुणाईचे लक्ष वेधणाऱ्या आकर्षक भेट वस्तू दुकानांमध्ये दाखल झाल्या आहेत. स्वत:चा वेगळा व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी प्रेमवीरांचे प्लॅनिंग सुरू असून यंदा नवे फंडे आजमावले जाणार का? हे पहायला मिळणार आहे.

व्हॅलेटाईन वीक फार्मात

दरम्यान, रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे तरुणाईने साजरे केले आहेत.७ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत व्हॅलेटाईन वीक साजरा केला जात आहे. या संपूर्ण आठवड्यात विशेष करून गुलाब फुलांचा जास्त वापर केला जातो. यंदा व्हॅलेटाईन वीक फार्मात असून या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व दुकानांमध्ये गुलाबासोबतच विविध आकारातील व लाल रंगातील चॉकलेट बॉक्‍स तसेच ग्रीटींग्ज, विविधरंगी टेडी बियर्स भेट वस्तू यांची रेलचेल दिसत आहे.

पाहा - व्हिडिओ : भाच्याने घेतला स्टार, मामाने उडवला हवेत बार....

तरुणाई नवे फंड आजमावणार

प्रेमाचा प्रतिक असलेल्या हार्टशेप आणि लाल रंग यांना विशेष महत्त्‍व आहे. हार्ट शेप असलेले कॉफी मग त्यावर लव्ह यू अशी अक्षरे लिहिलेली असतात तर काहींवर प्रेमी युगुलांचे चित्र असते. चॉकलेटच्या विविध आकारातील पॅकिंगलाही जास्त मागणी असून हार्टशेप चॉकलेट बास्केटसह विविध प्रकारची चॉकलेट गिफ्ट, चॉकलेट बुके, पिलो फोटो फ्रेम, कोटेशन बुक, लव्ह स्क्रॅप हे हटके पर्याय आहेत. रोटेटिंग फोटोफ्रेमची मोठ्या प्रमाणात चलती आहे. या फ्रेममध्ये हार्टशेपचे चार फोटो लावता येतात. म्युझिक बॉक्‍स, मुलांसाठी विविध रंगातील डिझाईन टी शर्ट, परफ्यूम उपलब्ध आहेत. मुलींसाठी कानातले रिंग्ज, कपल पेंडेटस, टॉप्स तसेच दागिणे ठेवण्याच्या विविध आकारातील पेट्या विक्रीस आल्या आहेत.

व्हॅलेंटाईनमुळे कॉफी शॉप बहरले

नेहमीच प्रेम युगुलांची वर्दळ असणाऱ्या कॉफी शॉपना व्हॅलेटाईन विकमुळे वेगळा लूक आला आहे. तरुणाईच्या मनातील लव्ह थीमने कॉफी शॉप सजले आहेत. प्रेम युगुलांसाठी संवादाला मोकळीक देणारे हे कॉफी शॉप व्हॅलेंटाईनमुळे चांगलेच बहरले आहेत.

व्हॅलेंटाईन विकमध्ये लागणारे प्रत्येक दिवसाचे आकर्षक गिफ्ट उपलब्ध आहेत. बदलत्या तरुणाईमुळे यंदा नाविन्यपूर्ण गिफ्टची चलती आहे. टेडी हेडफोन, बुलेट परफ्यूम, छोटे कोटेशन बुक, लव्ह स्क्रॅप, कॉफी मग, विविधरंगी ग्रिटिंग यांना अधिक मागणी आहे.
-शाम जाधव, गिफ्ट व्यवसायिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentine's Week is on the rise kolhapur

Tags
टॉपिकस
Topic Tags: