PHOTO : कोल्हापुरच्या अवलियाने फोटोग्राफीतून उलगडले पक्षांचे विश्व  

 धनाजी सुर्वे 
Thursday, 29 October 2020

कोल्हापुरातील जिवबा नाना पार्कमधील प्रकाश महादेव पाटील यांनी आपल्या फोटोग्राफीतून कोल्हापूर शहरातील पक्षांचे विश्व उलगडले आहे. 

कोल्हापूर - कोरोनासारख्या महामारीने ग्रासल्यामुळे गेल्या सहा-सात महिन्यात संपूर्ण जगाचं चक्रच थांबलय. व्यवसाय, व्यवहार ठप्प झालेत. या महामारीला रोखण्यासाठी  जगासोबत आपल्या देशातही लाॅकडाऊन पुकारण्यात आला. त्यामुळे अनेक जण आपला वेळ घरातच घालवू लागले. याच लाॅकडाऊनचा सदुपयोग करत अनेकांनी आपले छंदही जोपासले आहेत. असाच छंद जोपासत कोल्हापुरातील सानेगुरूजी वसाहतीमधील प्रकाश महादेव पाटील (मुळ राशिवडे बुद्रुक येथील) यांनी आपल्या फोटोग्राफीतून कोल्हापूर शहरातील पक्षांचे विश्व उलगडले आहे. 

जिवबा नाना जाधव पार्क, कळंबा तलाव परिसर, बालिंगा आणि पिरवाडी  या भागात काही वेगळ्या प्रकारचे पक्षी आल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी या पक्षांना आपल्या कॅमेऱ्यात टिपले. या पक्षांविषयी त्यांनी कोल्हापुरातील पक्षी तज्ञ सुहास वायंगणकर यांनी त्या पक्षांची नावे आणि त्यांची माहिती सांगितली. अशा विविध प्रकारच्या बावीस पक्षांचे विश्व त्यांनी उलगडले आहे.  

आर्ट काॅलेजचे शिक्षण झाल्यानंतर फोटोग्राफिचा छंद वाढत गेला. तेव्हापासून मी विविध प्रकारचे फोटो काढत व ते संग्रहित ठेवत गेलो. त्याचा अभ्यास वाढवला आणि विविध प्रकारच्या स्पर्धां आणि प्रदर्शनामध्ये सहभागी झालो. त्यातून मला 2015 ला कणेरी मठ येथे भारतीय संस्कृती उत्सवमध्ये राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी कोल्हापुरातील दसरा चौक येथे दरवर्षी भरणाऱ्या सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या कला महोत्सव इथेही राज्यस्तरीय स्पर्धे प्रथम पुरस्कार मिळाला.

- प्रकाश महादेव पाटील

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Various birds captured on camera by a photographer from Kolhapur