मुंबईकरांसह ग्रामस्थ एकवटले अन्‌ 'या' गावचे रूप पालटू लागले

Villagers United With Mumbaikars For Development Kolhapur Marathi News
Villagers United With Mumbaikars For Development Kolhapur Marathi News

उत्तूर : झुलपेवाडी (ता. आजरा) येथील ग्रामस्थ व मुंबईकर ग्रामस्थांनी स्थापन केलेल्या समाजभान फाउंडेशनने कोरोनाच्या काळात सामाजिक योजना राबवल्या. मंडळाने यासाठी 2 लाख 88 हजार रुपये खर्च केले. समाजातून समाजाकडे हे ब्रिद वाक्‍य घेऊन सुरू झालेल्या या मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. 

मंडळाने गावातील प्राथमिक विद्यामंदिर बोलकी शाळा बनवली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हॅंडवाश स्टेशन उभारले. शाळेतील एका वर्गात पावसाचे पाणी येत होते. यासाठी पत्र्याचे शेड उभारले. स्मशानभूमीत निवारा शेड उभारले व मोकळ्या जागेत 100 वृक्षांची लागवड केली.

वटपौर्णिमेला महिलांना पूजेसाठी दूर जावे लागत होते यासाठी गावाजवळील एका झाडाला पारकट्टा उभारला. गावातील दीपक तोडकर हा युवक मोटारसायकल अपघातात जखमी झाला होता. त्याला वैद्यकीय मदतीसाठी 73 हजार रुपयाची मदत केली. गावातील प्रत्येक घरात अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटल्या. ग्रामपंचायतीला टेंपरेचर गण मशीन दिली. यापुढेही फौंडेशनतर्फे समाजउपयोगी कामे करणार असल्याचे उपाध्यक्ष अमीत बेळवेकर, सचिव तानाजी पावले, खजिनदार परिमल जाधव यांनी सांगितले. 

गावात झालेली कामे 
बोलकी शाळा, हॅंड वॉश स्टेशन, शाळेतील वर्गासमोर शेड, स्मशानभूमी जवळ निवारा शेड, पार बांधून बांधकाम, दीपक दिनकर तोडकर या तरुणास वैदकीय मदत, कोरोना संकटात गावातील सर्व घरांमध्ये सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप, टेम्परेचेर गन मशीन 

शाळेचा र्जीोद्धार करणार
गावातील सुसज्य असे तीन लाखाचे प्रवेशद्वार उभारणार आहे. आठ लाख रुपये खर्च करून जुन्या शाळेचा र्जीोद्धार करणार आहे. 
- श्रीकांत धुमाळ, अध्यक्ष 

विकासाला हातभार
समाजभान फाउंडेशनने गावात चांगल्या योजना राबविल्यामुळे गावच्या विकासाला हातभार लागला. 
- नामदेव जाधव, सरपंच, झुलपेवाडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com