esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

 Warning students: The year of not filling the eligibility form will be wasted

सरुड ः कोरोच्या पार्श्वभूमीवर सर्वच शाळा,महाविद्यालये बंद आहेत. मात्र ज्या त्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन, ऑफलाईन प्रवेश नोंदवून घेतले जात आहेत, असे जरी असले तरी पात्रता अर्ज भरल्याशिवाय प्रवेश निश्‍चित होत नसल्याने महाविद्यालये बंद आहेत, म्हणून निर्धास्त असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे. तेव्हा वेळेत पात्रता करणे आवश्‍यक आहे. 

विद्यार्थ्यांनो सावधान ः पात्रता अर्ज न भरणाऱ्याचे वर्ष वाया जाणार

sakal_logo
By
डी.आर. पाटील सरूड

सरुड ः कोरोच्या पार्श्वभूमीवर सर्वच शाळा,महाविद्यालये बंद आहेत. मात्र ज्या त्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन, ऑफलाईन प्रवेश नोंदवून घेतले जात आहेत, असे जरी असले तरी पात्रता अर्ज भरल्याशिवाय प्रवेश निश्‍चित होत नसल्याने महाविद्यालये बंद आहेत, म्हणून निर्धास्त असलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे. तेव्हा वेळेत पात्रता करणे आवश्‍यक आहे. 

शिवाजी विद्यापीठाने एक परिपत्रक काढले असून यानुसार 19 सप्टेंबर अखेर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नियमित शुल्क भरून पात्रता करणे आवश्‍यक आहे. तरच आपला प्रवेश घेतलेल्या वर्गाचा प्रवेश निश्‍चित होईल अन्यथा परीक्षेला बसण्यास परवानगी मिळत नाही व प्रवेश ही ग्राह्य धरला जाणार नाही. परिणामी वर्ष वाया जाण्याची भीती आहे. 
पात्रता अर्ज विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरण्याचा आहे. कारण पात्रता पूर्ण झाल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश अंतिम होत नाहीत.मात्र ती बाबतचे शुल्क मुदतीत जमा करणे आवश्‍यक आहे. मुदतीनंतर शुल्क जमा केल्यास दंडासहीत पात्रता करावी लागेल. 
पदवी अभ्यासक्रमासाठी नियमित शुल्क 75 रुपये, विलंब शुल्क 50 रुपये तर विशेष विलंब शुल्क 200रुपये आहे.त्याचबरोबर नेहमीत शुल्क भरण्याची मुदत 1 ते 19 सप्टेंबर, विलंब शुल्क भरण्याची मुदत 20 ते 30 सप्टेंबर आणि विशेष विलंब शुल्क भरण्याची मुदत 1 ते 7 ऑक्‍टोबर अशी आहे. 

विद्यार्थ्यांनी वेळेत पात्रता अर्ज भरणे गरजेचे आहे. महाविद्यालयात नियमित विद्यार्थी येत नसल्याने दुर्लक्ष होणार असल्याने विद्यार्थ्यांनी सजग राहून पात्रता करावी अन्यथा याला विद्यापीठ अथवा संबंधीत महाविद्यालय जबाबदार राहणार नाही. 
- प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, विद्यापरीषद सदस्य, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.

संपादन -यशवंत केसरकर

go to top