sakal

बोलून बातमी शोधा

Water level of Panchganga up to 30 feet in kolhapur district opening of a gate of Radhanagari dam

पावसाची उघडझाप; पंचगंगेची पाणी पातळी ३० फुटांपर्यंत

नदीकाठच्या गावांना दिलासा ; पुराचे पाणी पात्राकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी पावसाचे प्रमाण तुरळक राहिले. राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडल्याने २८२८ पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, पुराचे पाणी गतीने पात्राकडे जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. २२ बंधारे पाण्याखाली आहेत. गेल्या तीन दिवसात पावसाने दिलासादायक उघडीप दिली आहे.

हेही वाचा- विद्यार्थ्यांनो सावधान ः पात्रता अर्ज न भरणाऱ्याचे वर्ष वाया जाणार -


आलमट्टीतून धरणातून १ लाख १७ हजार ९२२ क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पातळी ३० फुटांवर आली आहे. जिल्ह्यात सकाळी अर्धा तपास हजेरी लावली. त्यानंतर सायंकाळी पाऊण तास रिपरिप सुरू राहिली. दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने समाधानकारक उघडीप दिल्यामुळे पुराचे पाणी पात्राकडे जाण्यास मदत होत आहे. पाणलोट क्षेत्रात उसंत.

हेही वाचा- खासदार संजय मंडलिक यांच्यासह पत्नी, मुलगा कोरोना बाधित -


राधानगरी तालुक्‍यात आज पावसाने उसंत घेतली असली तरी लक्ष्मी तलावाच्या स्वयंचलित दरवाजांपैकी एक दरवाजा खुला आहे. यातून व वीजनिर्मितीसाठी २८५६ क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पत्रात सुरू आहे. काळम्मावाडी धरणाच्या वीज निर्मितीसाठी अठराशे विसर्ग सुरू आहे. कालच्या तुलनेत तालुक्‍यात पावसाने उसंत घेतल्याचे दिसून आले. मात्र पाणलोट क्षेत्रातून पाणी येण्याची प्रक्रिया सुरू असल्याने राधानगरी धरणाचा एक दरवाजा खुला झाला आहे.

संपादन - अर्चना बनगे

go to top