वारणी कामगारांकडून 15 कोटींच्या  महसुलावर पाणी; माथाडी मंडळाचे दुर्लक्ष

 Water on revenue of Rs 15 crore from Warni workers; Neglect of Mathadi Mandal
Water on revenue of Rs 15 crore from Warni workers; Neglect of Mathadi Mandal

कोल्हापूर : राज्यातील विविध बाजारपेठांत शेतीमाल चढ, उतार करण्याचे काम माथाडी कामगार करतात. त्यांच्या कल्याणासाठी तसेच आर्थिक आधार देण्यासाठी जिल्हावार माथाडी मंडळे आहेत. मात्र, गेली आठ वर्षे मंडळाकडे लेव्हीची रक्कम भरण्यात वारणी कामगारांनी टाळाटाळ केली. त्यामुळे अंदाजे 15 कोटींच्या महसुलावर माथाडी मंडळाला पाणी सोडावे लागले आहे. 
अनेक वर्षे सुरू असलेल्या या लेव्ही चुकवेगिरीबाबत चिडीचूप भूमिका घेल्याने प्रामाणिक माथाडी कामगारांना मिळणारे लाभही हिरावले जाण्याची शक्‍यता आहे. राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या शेतीमालाची पोती गाडीतून उतरून घेतल्यानंतर त्यासाठी 600 रुपये टन मजुरी वारणी कामगारांना मिळते. त्यावर 30 टक्के रक्कम लेव्ही म्हणून माथाडी मंडळाकडे भरावी लागते. लेव्ही भरण्याचे काम वारणी कामगार करतात. गेल्या 25 वर्षांपूर्वी माथाडी, कामगार मंडळांची स्थापना झाली. या मंडळातर्फे माथाडी कामगारांना विविध लाभ देण्यात येतात. यात माथाडी कामगारांसाठी औषधोपचार खर्च, मुलांसाठी शिष्यवृत्ती, ग्रॅच्युइटी, वाहनांसाठी कर्ज आदी सुविधा देण्यात येतात. मजुरीच्या रकमेच्या 30 टक्के रक्कम लेव्ही म्हणून माथाडी मंडळाकडे भरावी लागते. त्याची अधिकृत पावती संबंधित मालवाहतूकदाराला द्यावी लागते. 
आठ वर्षांतही दरमहा फक्त दोन ते तीन लाखांची रक्कम माथाडी मंडळाकडे भरावी लागते. वास्तविक, बाजार समितीत येणाऱ्या शेतीमाल वाहतुकीचा आवकेचा अंदाज घेतल्यास किमान 10 ते 15 लाखांची लेव्हीपोटीची रक्कम माथाडी मंडळाकडे जमा होणे अपेक्षित आहे. मात्र, तेवढी रक्कम जमा झालेली नाही. 

यार्डात शंभरावर वारणी कामगार 
मार्केट यार्डात जवळपास 40 ते 50, तर शिरोली नाका येथे 100 वर वारणी कामगार आहेत. यातील काहींनी प्रामाणिकपणे लेव्ही भरली. मात्र, बहुतेकांनी भरलेली नाही, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या आठ वर्षांतील आवकेचा अंदाज घेतला असता अंदाजे 15 कोटींची लेव्ही रक्कम आहे. 

""लेव्हीची रक्कम कमी भरण्याचा प्रकार अनेक वर्षे सुरू आहे. काही कोटींची लेव्ही चुकवली आहे. याबाबत माथाडी मंडळाने लक्ष घालून न भरलेली रक्कम संबंधित वारणी कामगारांकडून वसूल करावी. हमाल पंचायतीने स्मरणपत्रे दिली आहेत. मात्र, फरक पडलेला नाही, 

कृष्णात चौगुले, सचिव, जिल्हा हमाल पंचायत 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com