दुर्गम, डोंगरी भागात कुठल्या कोविड योध्द्यांचे काम ठरतेय देवदूतासारखे...वाचा

0
0

कोल्हापूर : सर्दी, खोकला, ताप किंवा अन्य काही नियमित आजार असेल तर सरसकट सर्वांनाच स्वॅब तपासा तो निगिटीव्ह आला तरच उपचार देतो, अन्यथा तुमचे तुम्ही बघा असे सांगत शहरी भागातील अनेक खासगी डॉक्‍टर हातवर करीत आहेत. या उलट डोंगरी, दुर्गम जंगली भागातील काही मोजक्‍या क्‍लिनिकलचे डॉक्‍टर मात्र नियमित आजारी रूग्णांची तपासणी व उपचार करीत शेकडो रूग्णांना बरे करीत आहेत. ज्यांना खरोखर कोरोनाची लक्षणे दिसतात त्यांनाच स्वॅब तपासणी प्राधान्याने पाठवत आहेत. त्यामुळे डोंगरी दुर्गम भागातील क्‍लिनिकची सेवा वरदान ठरत आहे. 

कोरोना झाला की, 14 दिवस क्वाटंराइन व्हावे लागेल याची भीती अनेकांना आहे. अशात शहरी, निमशहरी भागातील अनेक मोठ्या दवाखान्यात नियमित आजारांवर उपचारसेवा बंद आहे. किंवा नियमित आजारींनाही स्वॅब तपासणीसाठी पाठवले जाते. याचा अनेकांनी धसका घेतलेल्यांना दुखणे अंगावर काढण्याची वेळ येत आहे. यात काही खासगी डॉक्‍टरांनी तर आपल्या क्‍लिनिकमध्ये किंवा हॉस्पीटलमध्ये कोणी कोरोना पॉझिटिव्ह आले तर दवाखाना तात्पूरता बंद करावा लागेल या भीतीने रूग्णांना हात न लावता फक्त लक्षणावरून औषधे देत आहेत. 

या उलट डोंगरी दुर्गम ग्रामीण भागात मोठी हॉस्पीटल नाहीत. मात्र, बीएएमएस, एमबीबीएस क्‍लिनिकचे डॉक्‍टर रूग्णसेवा देतात. दरवर्षी पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, हगवण, काविळ, फ्लुसदृश्‍य लक्षणे असलेल्यांना कोरोना काळातही क्‍लिनिकचे औषधोपचार देत आहेत. काही एमबीबीएस डॉक्‍टर गरजेनुसार इंजेक्‍शन, सलाईन देत रूग्णांना बरे करीत आहेत. 
राधानगरी, शाहूवाडी, आजरा, चंदगड तालुक्‍यातील अनेक रूग्ण खासगी क्‍लिनीकल डॉक्‍टरांच्या उपचार घेऊन बरे झाले आहेत. 

कोणीही रूग्ण उपचाराअभावी राहू नये, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. त्यानुसार आमचे क्‍लिनिक सुरू ठेवले. जवळपास पाच सहा गावातील 40 ते 50 रूग्ण ज्यांना नियमित आजार आहेत. त्यांची तपासणीकरून औषधे दिल्यानंतर ते बरे होत आहेत. लक्षणे बघून स्वॅब तपासणीसाठीही पाठवले जाते. 
- डॉ. नंदकुमार मगदूम 

ग्रामीण दुर्गम भागातील गरजू घटकातींल अनेक रूग्ण दुरच्या निमशहरी भागात जाऊन उपचार घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेक ठिकाणी पैशाची अडचणी येते तर कधी उपचाराला घेतले जात नाही. अशात दुखणे अंगावर काढण्याची वेळ येते. अशा रूग्णांची परवड होऊ नये म्हणून उपचार सेवा देतो. याशिवाय कोरोना कालावधीत 108 रूग्णवाहिकांवर गंभीर रूग्णांना हॉस्पीटलमध्ये पोहचविण्यासाठी दिवस रात्र सेवेत असतो. 
- डॉ. अप्पासाहेब बामणे 
 

संपादन ः विजय वेदपाठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com