राशिवडे बुद्रुकजवळ बकऱ्यांच्या तळावर वन्य प्राण्याचा हल्ला 

राशिवडे बुद्रुकजवळ बकऱ्यांच्या तळावर वन्य प्राण्याचा हल्ला 

राशिवडे बुद्रुक : येथील विलास शिवा जोंग यांच्या बकऱ्यांच्या तळावर मध्यरात्री वन्य प्राण्यांनी हल्ला करून सुमारे दहा बकऱ्यांचा बळी घेतला. सहा जखमी असून 30 वर बकरी गायब झाली आहेत. पावलांच्या ठशांवरून बिबट्यासदृश प्राण्याने हल्ला केल्याची शक्‍यता वर्तविली जात असली तरी वनविभाग मात्र साशंक आहे. 

येथून किलोमीटरवर असलेल्या हसूरकडील कुंभार आवा परिसरात विलास यांच्या दोनशे मेंढरांचा तळ बसला आहे. सभोवती वाघरे (जाळी) मारून सुरक्षित ठेवलेल्या मेंढरांवर रात्री प्राण्यांनी हल्ला चढविला. वाघरी फाडून मेंढरावर हल्ला करून 10 मेंढरं जागीच ठार, तर सहा जखमी केली. भेदरलेली तीसहून अधिक बकरी शिवारात दाहीदिशा पळाली. आज सकाळी कळपावर हल्ला झाल्याचे जोंग यांना दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने ग्रामपंचायत सदस्य सागर धुंदरे व दत्ता जोग यांना कळविले. त्यांनी याबाबत पाहणी करून प्रादेशिक वनक्षेत्रपाल श्री. बिराजदार यांच्याशी संपर्क साधला. 

पाहणीनंतर अनेक बकरी कळपातून गायब असल्याचे दिसून आले. ती सर्व आसपासच्या उसाच्या फडात गेल्याचे आढळले. त्यापैकी दुपारपर्यंत सहा मृतावस्थेत आढळली आहेत. पायाच्या ठशावरून बिबट्यासदृश प्राणी असल्याचे वाटते. मात्र, तो "बिबट्या, तरस की भटक्‍या कुत्र्यांचा' कळप आहे. याबाबत अद्याप निश्‍चित सांगण्यात आलेले नाही. 

वनविभागाचे राजाराम तिवडे, उमा जाधव, मंडल निरीक्षक देवीदास तारडे, तलाठी सुनील खेडकर, सरपंच कृष्णात पोवार, सदस्य सागर धुंदरे, यशवंत सेना जिल्हाप्रमुख संजय वाघमोडे आदींनी पाहणी केली. पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी राधानगरी डॉ. एन. डी. पवार, परिचर शंकर चांदणे यांनी पंचनामे केले. वनविभागाच्या पथकाने जवळपासच्या परिसराची पाहणी केली. 

घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, बिबट्या किंवा अन्य वन्यप्राणी अशी हानी करणार नाही. हा परिसर पाहता भटक्‍या कुत्र्यांचाही हल्ला असू शकतो. आमचा तपास सुरू आहे. 
- आर. व्ही. तिवडे, वनपाल म्हासुर्ली क्षेत्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com