कोल्हापूरच्या हद्दवाढीचा परिपूर्ण प्रस्ताव देणार

Will give a complete proposal of Kolhapur boundary extension
Will give a complete proposal of Kolhapur boundary extension

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला यापूर्वी तीनवेळा दिला आहे. आता नवा प्रस्ताव देताना तो परिपूर्ण असणे गरजेचे आहे. त्यामुळे हद्दवाढीचा प्रस्ताव कधी होणार, असे म्हणण्यात काही अर्थ राहणार नाही. त्याऐवजी परिपूर्ण प्रस्ताव देण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 
डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, ""कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय महत्त्वाचा आहे. हा प्रस्ताव तयार करण्याची सूचना मी नगरविकास विभागाला तसेच उपायुक्त निखिल मोरे यांना दिली आहे. त्याप्रमाणे माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. सर्व प्रकारची माहिती या प्रस्तावात असणार आहे. यापूर्वी महापालिकेने तीनवेळा हद्दवाढीचा प्रस्ताव दिला होता. महापालिका सभागृहानेही यापूर्वी ठराव केले आहेत. या सर्व ठरावांची प्रस्तावातील माहिती पाहूनच नवा परिपूर्ण प्रस्ताव करावा लागेल. त्यामुळे यामध्ये घाई केली तर मूळ उद्देश सफल होणार नाही. राज्यशासनाने मध्यंतरी प्राधिकरणाचीही स्थापना केली होती. त्यामुळे या सर्वबाबी तपासून एक चांगला परिपूर्ण प्रस्ताव तयार केला जाईल.'' हद्दवाढविरोधी कृती समितीने बैठक घेतल्याकडे बलकवडे यांचे लक्ष वेधले असता प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यावर मी प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही. 

886 होर्डिंग्ज जप्त 
महापालिकेने काही दिवसांपासून खुल्या जागेवरील अतिक्रमणे काढून टाकली आहेत. तसेच अनधिकृत होर्डिंग्जवरही कारवाई करुन सुमारे 886 होर्डिंग्ज जप्त केले आहेत. दोघा जणांवर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ंत्याचबरोबर कोरोना प्रतिबंध लसीकरणही शहरात सुरू असून, पहिल्या दिवशी 183, दुसऱ्या दिवी 225 तर तिसऱ्या दिवशी 312 जणांना लस दिली आहे.

-संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com