Republic Day 2020 : 'या' माऊलीला मिळाला ध्वजारोहणाचा मान....

Women Republic Day To Flags In Kolhapur News Marathi
Women Republic Day To Flags In Kolhapur News Marathi

उजळाईवाडी  (करवीर ) : येथील लोकनियुक्त सरपंच महादेव पाटील यांनी आपला ध्वजारोहन करण्याचा मान महिला सफाई कामगार सौ. नंदा कांबळे यांना देऊन एक नवीन आदर्श निर्माण केलेला आहे .त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाचे व पुरोगामी विचारसरणीचे सर्वत्र कौतुक होत असून माना पानाच्या जंजाळात न गुंतता मनाचा मोठेपणा दाखवत गावातील स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कामगार यांच्याकडूनच ध्वजारोहण करण्याचा स्तुत्य उपक्रम गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी राबविला.

लोकांच्या मध्ये आत्मीयता निर्माण 

गावातील सर्वच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करण्यात आला .त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, खेळाडू, उद्योजक ,पत्रकार व नागरिकांचा सत्कारही यावेळी ग्रामपंचायतीच्या मार्फत करण्यात आला वास्तविक गावोगावी खुर्चीसाठी  व ध्वजारोहणाचा मान मिळण्यासाठी राजकारणामध्ये बरेच महाभारत घडत असते. 

हा मान मिळवण्यासाठी राजकीय कुरघोड्या, वाद-विवाद सर्वश्रुत आहेत.  परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव या गावातील लोकनियुक्त सरपंच महादेव पाटील यांनी मात्र अशा माना पानाच्या आणि प्रतिष्ठेच्या गुंत्यात न अडकता मनाचा मोठेपणा दाखवत ग्रामपंचायत सफाई कामगार सौ नंदा कांबळे यांना ध्वजारोहन करण्याचा सन्मान दिला त्याचबरोबर गावासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार या दिमाखदार सोहळ्यामध्ये करण्यात आला.

लोकनियुक्त सरपंच महादेव पाटील यांचा लोकांच्यामध्ये मिळून-मिसळून राहण्याचा स्वभाव व जनतेच्या अडी- अडचणीच्या वेळी तत्परतेने धावून जाण्याच्या स्वभावाचे सर्वच स्तरातील नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com