मलगेवाडी कोदाळी रस्त्याचे काम कासवगतीने

Work On Malgewadi Kodali Road Was Delayed Kolhapur Marathi News
Work On Malgewadi Kodali Road Was Delayed Kolhapur Marathi News

चंदगड : मलगेवाडी ते कोदाळी या सुमारे 40 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम गेल्या वर्षी सुरू झाले. मात्र अद्याप या कामाने मलगेवाडीची हद्द ओलांडलेली नाही. जागोजागी रस्ता खुदाई करण्यात आली असून प्रत्यक्षात कामाचा उरक नसल्यामुळे तो वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

गारगोटी-गडहिंग्लज मार्गे चंदगड शहरातून पुढे दोडामार्ग तालुक्‍याच्या हद्दीवरील कोदाळी गावापर्यंत जोडणाऱ्या या रस्त्याची तीन टप्प्यात निर्मिती केली जात आहे. गारगोटी ते गडहिंग्लज पहिला टप्पा, गडहिंग्लज शहरापासून चंदगड तालुक्‍याच्या हद्दीवर मलगेवाडीपर्यंत दुसरा टप्पा आणि तिथून पुढे तिसऱ्या टप्प्याचे काम आता सुरू आहे. परंतु कामाची गती पाहता यावर्षी सुद्धा हा रस्ता पूर्ण होण्याची शक्‍यता कमी आहे.

पावसाळा तोंडावर आला तरी कामाने गती घेतली नसल्यामुळे प्रवासी आणि वाहनधारकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. त्याचे पडसाद नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीत उमटले. संबंधित ठेकेदार लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कोणालाही दाद देत नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करून वेळेत काम पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. 116 कोटी रूपयांच्या या कामासाठी ठेकेदाराने दहा वर्ष देखभाल दुरुस्ती करायची आहे. 

वैभव हरवल्याच्या प्रतिक्रिया 
चंदगड तालुक्‍याच्या हद्दीत मलगेवाडी येथे प्रवेश करताच गर्द वनराई लक्ष वेधून घेत होती. गारवा जाणवत होता. कोकण हद्दीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारच्या देशी झाडांमुळे निसर्गाचे अनोखे दर्शन घडत होते. परंतु रस्त्याच्या नावावर ही सर्व वृक्षराजी तोडून टाकल्यामुळे भकासपणा जाणवत आहे. चंदगडचे वैभव हरवल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com